![]()
तिवसा तालुक्यातील मुर्तीजापूर-तरोडा येथील आठवडी बाजार चौकात सत्य साई मंडळ व मुर्तीजापूर-तरोडा मित्र परिवाराच्या वतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्या बालगोपालांनी सजविलेल्या नंदीबैलांच्या जोड्या घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. पारंपरिक सणाच्या माध्यमातून लहान मुलांना बैलपोळ्याची ओळख व्हावी आणि त्यांच्यात संस्कृतीविषयीची आवड निर्माण व्हावी, असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. कार्यक्रमाला विश्वनाथ पाटील, पत्रकार अशोक पवार, दिलीपरश ढवळी, प्रवीण आळसपुरे व गणेश वाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सोहम नेवारे, अनुज कांबळे, युवराज वेरुळकर, हर्षल यादव, स्वरा वेरुळकर, कृष्णदेवी शिंदे व कान्हा सुमित मते यांची प्रोत्साहनपर बक्षिसांसाठी निवड करण्यात आली. मानाच्या बैलजोडीचा मान स्वराज संजय कांबळे यांच्या बैलजोडीला मिळाला. गजानन राऊत व निर्विकार लांडगे यांच्या वाजंत्री संचाच्या गजरात या बैलजोडीचे पूजन करण्यात आले. यावेळी सहभागी सर्व बालगोपालांना प्रोत्साहन म्हणून शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनाही खाऊ देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल वेरुळकर, विष्णुपंत ठवकर, शुभम नरोडे, संकेत वेरुळकर, गोपी वेरुळकर, आकाश मोहोड, अनिल बनते, रवींद्र तिरमारे व विनोद्रराव वेरुळकर यांनी परिश्रम घेतले. संचालन व आभारप्रदर्शन संजय कांबळे यांनी केले.
Source link
सजवलेल्या नंदीबैलांनी वेधले लक्ष:बालगोपालांना शालेय साहित्याची भेट