Headlines

सरकार पोरांना घाबरलेय, मोर्चा ईडीच्या दिशेने वळवायला हवा:विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून संजय राऊतांची सरकारवर टीका




नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) विद्यार्थ्यांचा संसदेवरील मार्च पोलिसांनी रोखल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘५६ इंच वाल्यांची हातभर फाटलीय’ विद्यार्थ्यांच्या संसदेवरील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विटर एक्सवरुन एक अत्यंत आक्रमक पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय! डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती; पण ते कठीण आहे! मोर्चाचा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा!” राऊतांच्या या सडेतोड भाषेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपोषण मागे घेण्याच्या वांगचुक यांच्या ३ अटी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या २३ दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी तीन प्रमुख अटी सरकारसमोर ठेवल्या आहेत. पहिली अट: शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीच्या (पेपर लीक) मुद्द्याची जबाबदारी सरकारने अधिकृतपणे स्वीकारली पाहिजे. दुसरी अट: CJP च्या शिष्टमंडळाला संसदेत जाण्याची परवानगी मिळावी आणि हा मुद्दा संसदेत मांडण्याचे ठोस आश्वासन खासदारांनी त्यांना द्यावे. तिसरी अट: जर वांगचुक यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संसदेत जाणे शक्य नसेल, तर खासदारांनी स्वतः सफदरजंग रुग्णालयात येऊन त्यांना हे आश्वासन द्यावे. रुग्णालयात बेकायदेशीर डांबल्याचा आरोप पोलिसांनी काल बळजबरीने आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, वांगचुक यांनी ‘X’ वरून एक अतिशय गंभीर दावा केला आहे. आपल्याला या रुग्णालयात बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले असून, आपल्या हालचालींवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रशासनाने जाणीवपूर्वक निर्बंध घातले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या या दडपशाहीचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर ठिय्या सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई आणि संसदेवरील मार्चला मिळालेल्या नकारामुळे विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. CJP च्या आंदोलकांनी आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी करत आहेत. या वाढत्या रोषामुळे दिल्लीतील तणाव अधिकच वाढला आहे. हेही वाचा.. रात्रभर चालले CJP चे आंदोलन, बॅरिकेडिंग तोडली:वांगचुक यांच्या पत्नीही पोहोचल्या, लोक रस्त्यावर झोपले; 14 PHOTOS-VIDEOS कॉकरोच जनता पार्टी (CJP) सकाळी 9 वाजता जंतर-मंतरपासून संसदेपर्यंत ‘चलो संसद’ मोर्चा काढणार आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. जंतर-मंतरवर 10 हजार आंदोलक जमले आहेत. आंदोलन रात्रभर सुरू होते. लोक मध्यरात्रीपर्यंत आंदोलनात सहभागी होण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचत राहिले. सोमवारी सकाळी सुमारे 5.30 वाजता आंदोलकांनी पोलिसांची बॅरिकेडिंग तोडली. पाहा 14 फोटो-व्हिडिओ.. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *