.

शहराचे तापमान बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही पारा ४३ अंशावर कायम होते. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही नगरकरांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. गुरुवारीदेखील तापमानाचा पारा ४३ अंशावर कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यातील बहुतेक दिवस तापमान ४०-४२ अंशावर होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान घसरले होते. मात्र सोमवारपासून पुन्हा त्यात वाढ होऊ लागली होती. छाया: कार्तिक मेहेत्रे.
६६ वर्षांमध्ये ७ वेळा तापमान ४३ च्या पुढे ९ मे १९६० ला नगरमध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाची ४३.७ नोंद झाली होती. त्यानंतरच्या ६६ वर्षांच्या काळात, तापमान ४३ अंशांचा टप्पा ओलांडण्याच्या घटना दुर्मिळ असल्या तरी गेल्या दोन दशकांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. ९ मे १९६० ला ४३.७, १० मे २०१० ला तापमान ४३ पेक्षाही अधिक होते. मे २०१९ ला सलग ४ दिवस तापमान ४२ ते ४३ अंशावर होते. मे २०२४ मध्ये देखील ४३ अंशावर तापमान गेले होते. आतापर्यंत ७ वेळा ४३ अंशावर तापमान गेले होते.