Headlines

ससून रुग्णालयातील 'मावशी' व 'दाई' यांचा सन्मान:अमनोरा येस फाउंडेशनतर्फे 'मीरा देशपांडे सेवा सन्मान' पुरस्कार प्रदान




ससून रुग्णालयातील रुग्णसेवेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘मावशी’ आणि ‘दाई’ यांचा अमनोरा येस फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. सिटी ग्रुपच्या अमनोरा येस फाउंडेशनने ‘स्व. मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार’ प्रदान केला. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव, सिटी ग्रुपचे मुख्य सामाजिक अधिकारी विवेक कुलकर्णी आणि बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. या पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये रोख रक्कम, साडी, शाल आणि सन्मानचिन्ह असे होते. श्रीमती गंगुबाई धोंडीबा दळवी, रुमिला रवी शिंदे, शैला सुरेश सैद, सुनीता रविंद्र कांबळे, गौरी रविंद्र गोहीरे आणि सुनीता कैलास गायकवाड या सहा ‘मावशी’ व ‘दाई’ यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात ससून नर्सिंग कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनी प्राची बाळू चव्हाण, सिमरन सुरेंद्र मोरे, सय्यद इस्मिया जावेद आणि प्रतीक्षा जाधव यांना ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्तीमध्ये प्रमाणपत्र आणि 15 हजार रुपये रोख रक्कम समाविष्ट होती. अमनोरा येस फाउंडेशन ‘रूरल गर्ल्स अकादमी’ हा उपक्रमही राबवते. या माध्यमातून आतापर्यंत चार विद्यार्थिनी क्लास-वन अधिकारी, डॉक्टर आणि इंजिनियर झाल्या आहेत. दरवर्षी सुमारे 40 विद्यार्थिनींना मीरा देशपांडे शिष्यवृत्ती दिली जाते. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात अमनोरा येस फाउंडेशन विविध उपक्रम राबवत आहे. वंचित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *