Headlines

सहा महिन्यांत 465 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:तरीही मुख्यमंत्र्यांचे पोकळ आश्वासन- इम्तियाज जलील; ठाकरेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाड्याचा विकास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रंगांचे राजकारण आणि मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले आहे. विशेष म्हणजे, कायम रंगावरून राजकारण करणाऱ्यांना चपराक लावण्यासाठी जलील यांनी आज चक्क भगवा कुर्ता परिधान केला होता. तसेच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यातील आंदोलनाला त्यांनी आपला १०० टक्के पाठिंबा जाहीर केला आहे. रंगावर कुणाचीही मक्तेदारी नाही इम्तियाज जलील म्हणाले, मराठवाड्याच्या विकासावर चर्चा करण्याऐवजी कुणी हिरवा कपडा घातलाय की भगवा, यावर जास्त चर्चा होते. काही राजकीय मित्र मला ‘हिरवा साप’ म्हणायचे. आज तोच ‘हिरवा साप’ भगवा कुर्ता घालून आला आहे, आता तुम्ही काय म्हणणार? रंगावर कुणाचीही मक्तेदारी नाही. तिरंग्यातही भगवा, हिरवा आणि पांढरा रंग आहे. हे रंग एका जाती-धर्माचे कॉपीराईट नाहीत. ज्या दिवशी आपण हे सर्व रंग सामावून घेऊ, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने मराठवाड्याचा विकास होईल.” राजनैतिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असा संदेशही त्यांनी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसोबत हसत-खेळत गप्पा मारून दिला. मुख्यमंत्र्यांनी जुन्या घोषणांचा हिशोब द्यावा मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका करताना जलील म्हणाले की, “गेल्या दोन-तीन वर्षांची देवेंद्र फडणवीस यांची भाषणे काढली तर ती सारखीच आहेत. मराठवाड्यासाठी काय करणार, याच्या फक्त घोषणा केल्या जातात. जानेवारी ते जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांत मराठवाड्यात ४६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पाण्याची भीषण टंचाई आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी आज कोणतीही ठोस मदत जाहीर न करता फक्त पंचनाम्याची घोषणा केली.” त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले की, येत्या ऑक्टोबरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष कॅबिनेट बैठक घ्यावी आणि नवीन घोषणा करण्यापूर्वी जुन्या आश्वासनांचा हिशोब जनतेला द्यावा. मला ‘हिरवा साप’ म्हणायचे, आज मी भगवे कपडे घातलेय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे जलील यांनी स्वागत केले. “लोकशाहीत प्रश्न विचारणारे कोणीतरी पाहिजे. आज उद्धव साहेब इथे येऊन सरकारच्या आश्वासनांचे पोस्टमार्टम करत आहेत. हे आंदोलन राजकारणाशी संबंधित नसून मराठवाड्याच्या पाणी, रस्ते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित आहे. त्यामुळे केवळ आमचाच नाही, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही याला पाठिंबा दिला पाहिजे. आमचे या आंदोलनाला १००% समर्थन आहे,” असे जलील यांनी स्पष्ट केले. जरांगेंनी मंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडायला नको होते मनोज जरांगे पाटील यांनी शासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतल्याच्या मुद्द्यावर इम्तियाज जलील यांनी खंत व्यक्त केली. “मनोज जरांगे यांना मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबईपर्यंत जायला हवे होते. आणि जर उपोषण सोडायचेच होते, तर जे मंत्री केवळ फुकटीची आश्वासने देतात त्यांच्या हस्ते सरबत घेण्याऐवजी, एखाद्या सामान्य मराठा कुटुंबातील लहान मुलाच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडायला हवे होते. तरीही, त्यांच्या पुढील लढ्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत,” असे जलील म्हणाले. ———— ही बातमी पण वाचा.. अडीच वर्षांत मी शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्ती दिली:आता तुमचे साडेतीन रुपये तरी शेतकऱ्यांना मिळालेत का? मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ठाकरेंचे प्रत्युत्तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि राज्य सरकारचे धोरण यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिवे लावण्याच्या आवाहनावर संताप व्यक्त करताना, “शेतकऱ्यांच्या घरातले वंशाचे दिवे विझत असताना हे दिवे लावून काय साजरे करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मराठवाड्याचे नेतृत्व जाणीवपूर्वक संपवले जात असल्याचा आरोप करताना गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडले नसल्याचा दावाही त्यांनी केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *