![]()
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा क्रमांक- १ अंतर्गत महसूल विभागाच्या राहाता मंडलाच्यावतीने विविध विभागीय शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रांत अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. साई विठ्ठला लॉन्समध्ये शिबीर आयोजित केले होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंढे, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, कैलास सदाफळ, मोहन सदाफळ, पुरवठा अधिकारी भारत खरात, तलाठी कृष्णा शिरोळे उपस्थित होते. प्रांताधिकारी आहेर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्यावतीने ज्या विविध योजना राबविल्या जातात त्या योजना महसूल विभागाच्या तहसील कार्यालय तसेच नगरपरिषदेच्यावतीने पारदर्शकपणे त्यांचे वाटप करण्यात येते. त्यादृष्टीने २०११ पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन केले जाते. यामध्ये ई-फेरफार दुरूस्ती, जिवंत सातबारा मोहीम, विविध शालेय दाखले, पंतप्रधान किसान सन्मान योजना, शेतीची ई- मोजणी, लाडकी बहीण योजना, शिधापत्रिका अशा विविध योजनांचा समावेश आहे. जिवंत सातबारा योजनेतून १८०० दाखले राहाता तहसीलमधून देण्यात आले आहे तर ८७ टक्के शालेय विद्यार्थ्यांना दाखले मुक्त केले आहे. बळीराजा मार्ग योजनेतून राहता तालुक्यातील शेती रस्त्याचे कामासाठी दरवर्षी शासनाकडून दहा कोटी निधीद्वारे पक्के रस्ते बनणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रास्ताविकात विविध शासकीय योजनांची माहिती दिली. मोहन सदाफळ, संजय सदाफळ यांनी मनोगत व्यक्त केले. लोणीचे मंडल अधिकारी संदीप ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.
Source link
सातबारा दुरुस्तीपासून ते शेतरस्त्यांपर्यंत:महसूल शिबिरातून बळीराजाला दिलासा, राहात्यात समाधान शिबिराद्वारे विविध दाखल्यांचे वितरण