Headlines

Pakistan had fired 900 drones from Gujarat to Kashmir… all were destroyed, 4 plans of Pak-China-Turkey triad foiled


  • Marathi News
  • National
  • Pakistan Had Fired 900 Drones From Gujarat To Kashmir… All Were Destroyed, 4 Plans Of Pak China Turkey Triad Foiled

नवी दिल्ली2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांना नवे सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) बनवले. सुब्रमणी जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील. चौहान ३० मे रोजी निवृत्त होत आहेत. सुब्रमणी सैन्य व्यवहार विभागाचे (डीएमए) सचिवही असतील. तिसऱ्यांदा भूदलातून सीडीएस, पहिले जनरल बिपिन रावत होते.

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय सैन्य दलांच्या समीक्षेत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. पाकिस्तान, चीन आणि तुर्कियेच्या त्रिकुटाने चार मनसुब्यांतून ७ आणि ८ मे च्या रात्री ९०० ड्रोन डागले होते. काश्मिरात एलओसीपासून गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत काही तासांत स्वॉर्म ड्रोन डागले होते. पण पाकचे स्वॉर्म ड्रोन भारतीय वायुसेनेच्या एअर कमांड व कंट्रोल सिस्टमने नष्ट केले. पाक भारताच्या एकाही महत्त्वाच्या सैन्य तळाला नुकसान पोहोचवण्यात यशस्वी होऊ शकला नाही. पाकने युक्रेन-रशिया युद्धात वापरलेल्या स्वॉर्म ड्रोन अटॅकची कॉपी केली होती. विशेष म्हणजे ही रणनीती अनेकदा नाटो देशांद्वारे आधुनिक युद्ध सिद्धांतात (वॉर डॉक्ट्रिन) वापरली जाते.

ड्रोन हल्ल्यांद्वारे भारतावर महागड्या युद्धाचा भार लादणे

पाक, चीन आणि तुर्किये स्वस्त एरियल हल्ल्यांद्वारे भारतावर अत्यंत महागडे आर्थिक युद्ध लादण्याच्या प्रयत्नात होते. ३० ते ५० हजार रु. किमतीचे ड्रोन डागून भारताला स्वसंरक्षणासाठी अडीच कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची क्षेपणास्त्रे चालवण्यास भाग पाडायचे होते.

रडार आणि इतर टोही नेटवर्कमध्ये घुसखोरी करणे

भारताचे रडार आणि इतर सर्व्हिलन्स नेटवर्क उघड करण्यास भाग पाडणे हा उद्देश होता. पाकिस्तान केवळ भारतीय कारवाईला उत्तर देण्याऐवजी नेटवर्क वॉरफेअरची तयारी करून बसला होता. यासाठी पाकला चीनने आपली सर्व्हिलन्स सिस्टम ‘बायडू’ देखील दिली होती.

एरियल सर्व्हिलन्समधील त्रुटी उघड करणे

भारतीय एरियल सर्व्हिलन्स आणि डिफेन्स मधील गॅप आणि त्रुटी उघड करणे हा हेतू होता. पण भारतीय वायुसेनेच्या एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टमचे यशही समोर आले आहे. सैन्य समीक्षेनुसार आईएसीसीएसमुळे नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअरची क्षमता सिद्ध झाली.

ॲडमिरल स्वामिनाथन नवे नौदल प्रमुख

व्हॉइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन नवीन नौदल प्रमुख असतील. ते ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची जागा घेतील. ते ३१ मे रोजी निवृत्त होताहेत.

भारताने पाक एअरबेस उडवून प्लॅन चौपट केला …

पहिल्या 24 तासांच्या या छद्म ड्रोन खेळांनंतर पाकिस्तान 9 मे रोजी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता. यामध्ये फायटर जेटचा वापर करण्याचा प्लान होता. पण भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यांनी त्याच रात्री पाकिस्तानच्या नूरखान सारख्या एअरबेसला लक्ष्य करून पूर्ण प्लान चौपट केला. भारताने पाकिस्तानवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करून त्यांच्या एअर डिफेन्सचे 20% इन्फ्रा नष्ट केले. पाकिस्तानचा प्लान ड्रोन हल्ल्यानंतर चीनच्या फायटर जेट्सनी हल्ला करण्याचा होता.

भारतीय एअर डिफेन्सला स्वस्त ड्रोनने त्रस्त करणे

भारताची एअर डिफेन्स क्षमता स्वस्त ड्रोन पाडण्यात संपवणे हा उद्देश होता. नवीन मूल्यांकनानुसार पाकला स्वस्त ड्रोन उपलब्ध करून देण्यात तुर्कियेचे योगदान होते. त्याने स्वस्त क्वाडकॉप्टर, टोही ड्रोन, लॉयट्रिंग म्युनिशन, टीबी-2 यूसीएवी, रॉकेट आणि एअरलाँचचा वापर केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *