![]()
शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनि जयंती आणि शनैश्चरी अमावस्या असा दुर्मिळ योग येत असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी प्रशासन आणि देव
.
देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस तहसीलदार सोनाली म्हात्रे, शनि शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि देवस्थानचे विभागप्रमुख उपस्थित होते.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शनि जयंती आणि शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी भाविकांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी राहणार असून सर्वांना खालील रांगेतूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. दर्शन व्यवस्थेसोबतच वाहनतळाचेही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी आरोग्य केंद्र, मदत कक्ष भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य केंद्र, मदत कक्ष, पिण्याचे पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि अखंडित वीजपुरवठा चोवीस तास सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि देवस्थान व्यवस्थापन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असून भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.
सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेण्यात येणार ^वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग स्थळांपासून मंदिरापर्यंत वाहनांना विशेष परवानगी देण्याबाबत चर्चा करण्यात आली असून त्यासाठी पोलीस प्रशासन स्वतंत्र नियोजन करणार आहे. भाविकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी पोलीस आणि देवस्थानचे सुरक्षा रक्षक विशेष दक्षता घेणार आहेत. – आशिष शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक.
अशी असेल पार्किंगची व्यवस्था { शिर्डी-शिंगणापूर मार्ग : देवस्थान मालकीची जागा { घोडेगाव – शिंगणापूर मार्ग : ग्रामीण रुग्णालयाजवळ कागोणी – शिंगणापूर मार्ग : हायस्कूल परिसर