Headlines

साताऱ्यात चेन स्नॅचर्सची दहशत कायम:दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरदट्यांचा पोबारा, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




सातारा शहर आणि परिसरात चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ सुरूच असून आणखी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीमंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सातारा तालुका व सातारा शहर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर (ता. सातारा) येथील छाया विजय देशमुख (वय ६८) या ३० जुलै रोजी आपल्या नातवासह पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. दुसऱ्या घटनेत गोडोली येथील सोनाली विजय वाघेला (वय २९) या २३ जुलै रोजी पायी जात असताना दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीचे मिनीमंगळसूत्र क्षणार्धात लंपास केले. या दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू असून चेन स्नॅचर्सचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. मिरवणुकीत नियमभंग महागात; ७ डीजे चालकांवर गुन्हे दाखल साताऱ्यात शनिवारी झालेल्या मिरवणुकांदरम्यान पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शहर, शाहूपुरी आणि संबंधित पोलिस ठाण्यांनी एकूण सात डीजे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी शुभम चव्हाण यांनी अभिषेक रविंद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावली) व सुरज दिनकर पवार (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याविरुद्ध स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या. मतकर कॉलनी आणि बुधवार पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस कर्मचारी दिपक पोळ यांनी अरिफ सलीम मुलाणी (रा. कार्वे, ता. कराड), तसेच रोहित तानाजी बाचल आणि रोहन उमेश गोरे (दोघेही रा. सैदापूर, ता. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. शनिवार चौक, देवी चौक आणि गोलबाग परिसरात नियमभंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय, चिंतामणी साउंडचे सुधीर सपकाळ (रा. चिंचणेर-वंदन), साम्राज्य साउंड सिस्टिमचे विवेक सुनील भोसले (रा. कोळकी, ता. फलटण) आणि पाटील साउंड सिस्टिमचे प्रतीक सुनील माने (रा. डबेवाडी, ता. सातारा) यांच्याविरुद्धही कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी मिरवणुकीदरम्यान मोती चौकात झालेल्या ठिय्या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *