![]()
सामाजिक संस्थांना शासन स्तरावर योग्य प्रतिनिधित्व मिळावे. त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवावी. हा विषय राज्य शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा. यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. निवेदन सादर केले. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी मंत्री सावे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या विविध समस्यांवर राज्यपाल, सांस्कृतिक मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करावी. या बैठकीचे नेतृत्व करावे. विषय पुढे नेण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. बोडखे यांनी सांगितले की, राज्यभरातील अनेक सामाजिक संस्था समाजहितासाठी काम करतात. शासनाच्या विविध योजनांमध्ये त्यांना अधिक प्रतिनिधित्व हवे. निर्णय प्रक्रियेतही सहभाग हवा. शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. स्वयंसेवी संस्थांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी रवींद्र बोडखे, मंगेश वडगावकर, योगेश तळे, राजू तलबे, योगेश परदेशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी, एनजीओ क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Source link
सामाजिक संस्थांना शासनात प्रतिनिधित्व देण्याची मागणी:संस्थापक रवींद्र बोडखे यांचे मंत्री सावे यांना निवेदन