Headlines

ठेंगोड्यामध्ये नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत:ग्रामस्थांकडून शाळेसाठी देणगी देण्याची घोषणा‎




ठेंगोडा जिल्हा परिषद शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण व गणवेश वाटप तसेच नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून गावामधून मिरवणूक काढण्यात आली. गुलाबपुष्प देऊन तसेच ‘पहिले पाऊल’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बालगोपालांचा विशेष मेळावाही आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच भारती वाघ, उपसरपंच नारायण निकम, दौलत पगार, ॲड. नंदलाल अहिरे, शांताराम वाघ आदी उपस्थित होते. वसंत वाघ यांनी बैलगाडी सजवून विद्यार्थ्यांना गावातून फेरी घडवून आणत कार्यक्रमात विशेष योगदान दिले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्याचा खर्च ॲड. नंदलाल अहिरे यांनी उचलला. तसेच शाळेच्या वॉलकंपाउंड व कार्यालयाच्या डिजिटायझेशनसाठी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी जाहीर केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *