Headlines

सामूहिक अत्याचार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवारांच्या अडचणी वाढल्या:भिवंडी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष




भिवंडी तालुक्यातील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना न्यायालयाकडून धक्का बसला आहे. भिवंडी सत्र न्यायालयाने नरेंद्र पवार यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे नरेंद्र पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात नरेंद्र पवार यांच्यासह बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नरेंद्र पवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद तसेच सरकारी पक्षाने मांडलेली बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. त्याचबरोबर फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणेही न्यायालयासमोर मांडण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीला नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेण्यात आल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांकडे केली. गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवून आणि दारू पाजून सामूहिक शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पडघा पोलीस ठाण्यात नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले. नरेंद्र पवार यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना यासंदर्भात पत्रही दिले. आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने आता या प्रकरणातील पुढील पोलिस कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. तपासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काय पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भिवंडी सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली. “सत्याचा विजय झाला आहे. लोकशाही आजही जिवंत आहे, याचे उदाहरण म्हणजे माजी आमदारांचा अटकपूर्व जामीन भिवंडी सत्र न्यायालयाने फेटाळला,” असे त्यांनी म्हटले. या प्रकरणातील आरोपांची चौकशी आणि पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. न्यायालयाने सध्या नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून, त्यानंतर पोलिसांकडून पुढील कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हेही वाचा… ज्ञानेश कुमारांच्या भूमिकेवरून ठाण्यात राष्ट्रवादी आक्रमक:गाढवावर बसवून प्रतिकात्मक धिंड, जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी निवडणूक आयोगाच्या कारभारावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर गेल्या 10 महिन्यांत किमान 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन केले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *