Headlines

सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी गावागावांमध्ये घेणार मेळावे:पाटील समाज वधू-वर सूचक मंडळाच्या सभेत आदर्श विवाह संकल्पना




डाबकी रोड येथील आपला माणूस डॉ. अशोक ओळंबे यांच्या निवासस्थानी पाटील समाज वधू-वर सूचक मंडळाची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी गावोगावी मेळावे घेण्यासह अन्य महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुभाषराव पाटील म्हैसने होते. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. अध्यक्षांचा कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्यावर चर्चा झाली. ‘लगीनगाठी’ वेबसाईट अद्ययावत करणे, वधू-वर परिचय मेळावे विविध ठिकाणी आयोजित करणे, सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे, या मुद्द्यांवर चर्चा झाली. विवाह समारंभातील अनावश्यक खर्च टाळावा. विवाह साध्या व आदर्श पद्धतीने करावा. ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विशेषतः दुष्काळग्रस्त शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू कुटुंबांतील मुला-मुलींचे विवाह कमी खर्चात पार पाडण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, समाजबांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन अॅड. संतोष गोळे यांनी केले. प्रास्ताविक वसंतराव माळी यांनी केले. आभार अरुण खोटरे यांनी मानले. या सभेला डॉ. अशोक ओळंबे, संजय इंगळे, श्याम मते पाटील, प्रा. संजय म्हैसने, संजय मालोकार, मोहन पाटील, रवींद्र निर्मळ, दीपक भाकरे, चंद्रकांत ताठे, डॉ. तेजराव नराजे, प्रा. विनायकराव धोरण, नंदकिशोर गावंडे, प्रा. देवलाल उजाळे, हिम्मतराव पोहरे, रमेश बारब्दे, संतोष काटे, संतोष आखरे, आर. पी. अंधारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यासाठी मंडळ करणार प्रयत्न : सामाजिक बांधिलकी जपत विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा संकल्प सभेत व्यक्त झाला. गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धारही व्यक्त झाला. आदर्श विवाहाची चळवळ समाजात व्यापक करण्यासाठी पाटील समाज वधू-वर सूचक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. आर्थिक भार पडू नये : म्हैसने दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांवर मुला-मुलींच्या विवाहाचा आर्थिक भार पडू नये. समाजातील गरजू कुटुंबांना दिलासा मिळावा. यासाठी उपवर मुला-मुलींचे विवाह आदर्श पद्धतीने, कमी खर्चात करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन माजी सैनिक सुभाषराव पाटील म्हैसने यांनी याप्रसंगी केले. सध्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत सामूहिक विवाहांमुळे शेतकरी कुटुंबांवर मुला-मुलींच्या विवाहाचा आर्थिक भार पडणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *