![]()
शहरात दिवाळीचा उत्साह असताना सिन्नरच्या रामनगरी परिसरातील ३४ वर्षीय तरुणाने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून ११ नोव्हेंबर रोजी गळफास घेत आत्महत्या केली. अतुल रामदास बोऱ्हाडे असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. अतुलने या आठ जणांकडून घेतलेली रक्कम परत केली होती. मात्र, ‘फक्त व्याज मिळाले, मुद्दल बाकी आहे’ असे सांगून आरोपींनी फोन, मेसेज आणि घरी येऊन शिवीगाळ करत त्याचा मानसिक छळ केला. याला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले. पत्नी प्रियंका बोऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी सचिन गिते, नलिनी गिते, हर्षल गोळेसर, सचिन धनगर, सौरभ खेडलेकर, मीरा खोपे, उज्ज्वला लोखंडे आणि माधुरी शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीसाठी काय आवश्यक? पैसे दिल्याचे बँक स्टेटमेंट, कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप मेसेज, कोऱ्या चेकचे किंवा स्टॅम्प पेपरचे पुरावे पोलिस व सहकार विभागाला द्यावेत. यात तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.
Source link
सावकाराचा तगादा; सिन्नर येथील तरुणाची आत्महत्या:पैसे परत करूनही ‘मुद्दल बाकी’; शिवीगाळ करायचे