![]()
सिल्लोड शहराच्या शास्त्रीनगर येथील सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाची तयारी यंदा उत्साहात सुरू झाली आहे. १९८४ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाला सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक उपक्रम
.
महाराणा प्रताप गणेश मंडळाची स्थापना १९८४ मध्ये विष्णू काटकर यांनी केली. स्थापनेपासूनच मंडळाने गणेशोत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न देता सामाजिक एकोपा, सांस्कृतिक जतन आणि जनजागृतीला प्राधान्य दिले आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाच्या वतीने वैष्णोदेवीचा देखावा उभारण्याचे काम सुरू आहे. अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखावा साकारण्यासाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांना धार्मिक आणि कलात्मक अनुभव देणारा हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. महाराणा प्रताप गणेश मंडळाने यापूर्वी सादर केलेल्या देखाव्याची दखल घेत पोलिस अधिकारी अमितेश कुमार यांच्या हस्ते मंडळाला प्रथम पारितोषिक मिळाले होते.
मान्यवरांनी केली गणरायाची आरती महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आणि सुरेश पाटील बनकर यांनी मंडळाच्या गणरायाची आरती केली आहे. त्यामुळे मंडळाच्या गणेशोत्सवाला शहरात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या काम गतीने सुरू आहे.