Headlines

बैल धुण्यास गेलेल्या मुलाचा पाझर तलावामध्ये बुडून मृत्यू:सिल्लोड तालुक्यातील पिरोळा येथे पोळ्याच्या दिवशी घटना‎




पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी पाझर तलावावर गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील पिरोळा शिवारात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संदीप संजय गोरे (१५, रा. काळेवाडी, पिरोळा) असे मृत मुलाचे नाव आहे. पोळ्याच्या सणानिमित्त संदीप हा त्याचे वडील, काका आणि चुलत भावासोबत काळेवाडीमागील पाझर तलावावर बैल धुण्यासाठी गेला होता. संदीपला तलावाच्या काठावर थांबवण्यात आले होते. मात्र, काठावर उभा असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. बचाव पथकाच्या मदतीने संदीपला पाण्यातून बाहेर काढुन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सपकाळ यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. संदीप इयत्ता नववीचा विद्यार्थी शिक्षण मयत संदीप गोरे हा नववीच्या वर्गात भराडी येथील शाळेत शिकत होता. वर्गातही तो हुशार होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ असा परिवार आहे. दुपारी बारा वाजता ही घटना घडताच सिल्लोड ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक रवींद्र ठाकरे, तहसीलदार सागर वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ बचाव पथक आणून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *