Headlines

सिल्लोडला महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने अभिवादन:नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन




प्रतिनिधी | सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप सिंह चौक येथे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सत्तार म्हणाले, स्वाभिमान, पराक्रम आणि मातृभूमीप्रती निष्ठा यांचे प्रतीक असलेले महाराणा प्रताप सिंह यांचे कार्य व विचार प्रेरणादायी आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, अशोक सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, सिद्धेश्वर आहेर, सुनील दुधे, अशोक बन्सोड, जितू आरके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह, शंकरराव खांडवे, सयाजीराव वाघ, कृउबा समितीचे संचालक शेख जावेद, युवासेनेचे अक्षय मगर, राहुल महाजन, राजेंद्र साठे, मानसिंग राजपूत, डॉ. विकास गोठवाल, डॉ.मध्यमसिंग मेहेर, अमरसिंग राजपूत, विठ्ठलसिंग ठाकूर, शैलेश गौर, विक्रांत गौर, संदीप झलवार, प्रभुलाल झलवार, देवसिंग करघे, रामदास पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी केशवराव तायडे यांनीही मनोगत व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *