![]()
अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत त्यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “जर भविष्यात रणनीतीकार म्हणून माझ्यासोबत काम करायचे असेल, तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल,” असा थेट सल्ला दिला आहे. 6 तासांची मॅरेथॉन चर्चा मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल सहा तास प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत जय पवार हे ऑनलाइन सहभागी झाले होते, तर प्रशांत किशोर यांच्या टीमचे दोन सदस्यही उपस्थित होते. विशेष म्हणजे, पार्थ पवार हे स्वतः चार्टर्ड विमानाने प्रशांत किशोर यांना मुंबईत घेऊन आल्याची माहिती आहे. प्रशांत किशोर यांची उघड नाराजी आणि अल्टीमेटम यापूर्वीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांची तीन वेळा भेट घेतली होती. त्यावेळी किशोर यांनी पक्षात काही संघटनात्मक बदल सुचवले होते. मात्र, मागील बैठकांमध्ये सुचवलेल्या बदलांची अंमलबजावणी न झाल्याने त्यांनी कालच्या बैठकीत जाहीर नाराजी बोलून दाखवली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत, जोपर्यंत राज्यातील नेतृत्वासोबत काम करण्यात सुलभता येत नाही, तोपर्यंत राज्यात काम करणे कठीण असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. नेतृत्व बदलाचा सल्ला का दिला? अजित पवार यांच्या अचानक जाण्याने पक्षाला सावरण्याची आणि नव्याने पक्षबांधणी करण्याची मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी दिलेला सल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही दिवसांत पक्षाबाबत होणारी नकारात्मक चर्चा थांबवण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी संघटनात्मक व नेतृत्व बदल आवश्यक असल्याचे मत किशोर यांनी व्यक्त केले. पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षाची गरज नवीन प्रदेशाध्यक्ष असा असावा, ज्याच्यावर इतर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी नसेल आणि जो आपला पूर्ण वेळ केवळ राज्यात पक्षबांधणी व संघटनात्मक कामात देईल, अशी आग्रही शिफारस त्यांनी केली आहे. प्रशांत किशोर यांच्या या स्पष्ट सल्ल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आता सुनील तटकरे यांच्याबाबत काय निर्णय घेतात आणि प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा देणार का, याकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… OBC राजकारणात नवा टर्निंग पॉइंट: जातनिहाय जनगणना का महत्त्वाची? मंडल यात्रा आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कशी बदलली! भारतात ‘जातनिहाय जनगणना’ हा विषय पुन्हा एकदा देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अत्यंत तीव्रतेने ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर, महाराष्ट्रात ओबीसी संघटना आणि राजकीय नेत्यांनी या प्रक्रियेला गती देण्याची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली भंडारा येथून विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ‘5वी मंडल जनगणना यात्रा’ सुरू झाली असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सविस्तर वाचा
Source link
सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रशांत किशोर यांचा थेट अल्टीमेटम, राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण