![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या (स्टुडंट विंग) राष्ट्रीय अध्यक्षपदी आकाश झांबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात आकाश झांबरे यांच्यावर पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नमूद केले आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी उत्साहाने व समर्पित भावनेने कार्य करावे, अशा शुभेच्छा सुनेत्रा पवार यांनी दिल्या आहेत. आकाश झांबरे हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील होळकरवाडी येथील रहिवासी आहेत. विद्यार्थी आणि युवकांमध्ये संघटनात्मक कामासाठी त्यांची विशेष ओळख आहे. या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थी आणि युवकांशी पक्षाचा संपर्क अधिक दृढ होण्यास मदत होईल, तसेच संघटन विस्तारासाठी नव्या उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. आकाश झांबरे यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अलीकडील महत्त्वाच्या नियुक्त्या
पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडील काळात या महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या माध्यमातून पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे प्रयत्न उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार करत आहे.
Source link
आकाश झांबरे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष:सुनेत्रा पवार यांनी दिले नियुक्तीपत्र