Headlines

सोलापूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी 18 लाख विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप:मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयपीएस अधिकारी शाळांना देणार भेटी‎




राज्यासह जिल्ह्यामध्ये सोमवार दि. १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात होत आहे. सदर शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मागणी २१ लाख ९९ हजार ५२२ करण्यात आली होती. तर पुस्तक पुरवठा १८ लाख ८ हजार ९०८ इतका करण्यात आला आहे. सदर पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये उत्सवाच्या वातावरणात पुस्तक वाटपासह गणवेश वाटप करून तसेच गावोगावी जिल्हा परिषद शाळेत वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्याचे स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तक वाटप गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप होणार असून बालभारती पुणे यांच्याकडून समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजना अंतर्गत इ. १ ली ते इ ८ वी च्या सर्व जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप १००% करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प प्रा आदर्श शाळा पापरी या शाळेला भेट देऊन विद्यार्थी स्वागत व मार्गदर्शन करणार आहेत. तर आय.पी.एस अधिकारी जि.प.प्रा.केंद्रशाळा पेनुर या शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या संदर्भात लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व जिल्हा स्तर खातेप्रमुख, तालुकास्तर खाते प्रमुख, शिक्षण विभाग पं.स.मोहोळ येथील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शालेय परिसरात प्रभात फेरी काढून सदर ठिकाणी शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण जनजागृती, सांडपाणी, घनकचरा नियोजन, स्वच्छता याविषयी फलक लेखनातून, आकर्षक वर जास्त सजावट – नवागत विद्यार्थ्यांच्या स्वतःसाठी आकर्षक वर्षात करण्यात येऊन, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागतासह गोड खाऊ वाटप करण्यात येणार आहे. गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल यामध्ये नवागत पहिलीच्या विद्यार्थ्याच्या पहिल्या पावलाचे शाळेतील पहिले पावलचा ठसा कागदावर उमटवून तो पालकांना भेट देणे. दप्तरा विना शाळा स्वागताचा दिवस भरवणे. पर्यवेक्षीय यंत्रणांची शाळा भेट. पटसंख्या वाढवणे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे असे उपक्रम शासनाने परिपत्रकाद्वारे कळविले आहे. त्यानुसार सर्व शाळा यासाठी सज्ज आहेत. अविचल महाडिक, गटशिक्षणाधिकारी, मोहोळ तालुकानिहाय पुस्तक मागणी आणि पुरवठाचा तक्ता



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *