Headlines

स्पर्धात्मक युगात योग्य शाखेची निवड करा:शरद सावंत यांचे आवाहन; नामपूरला आदर्श शिक्षण संस्थेतील दहावीतील गुणवंतांचा सत्कार‎



शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी योग्य शाखेची निवड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षण संस्थेत आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अध्यक्ष शरद सावंत या

.

श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान आणि आदर्श शिक्षण संस्था, नामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शरद नेरकर, सरचिटणीस स्नेहलता नेरकर आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नामपूर शालांत परीक्षा केंद्र, उन्नती एज्युकेशन सोसायटी नामपूर, सिद्धी इंटरनॅशनल तसेच बागलाण एज्युकेशन येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत होते. कार्यक्रमात नारायण सावंत, मनोहर पाटील, प्रशांत बैरागी, स्नेहलता नेरकर, रोहिणी सावंत, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *