Headlines

'हर्षजित देशमुख 15-20 कोटी घेऊन मॅनेज झाले':काँग्रेसच्याच नेत्याविरोधात यशोमती ठाकूरांचा आरोप, म्हणाल्या- निवडणुकीत घोडेबाजार सुरू




राज्यात सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराचे आरोप होत असतानाच, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन ‘मॅनेज’ होत असल्याचा खळबळजनक दावा ठाकूर यांनी केल्यामुळे या निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे अचानक गायब झाल्याची चर्चा रंगली होती, मात्र ते सध्या नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. यावर स्वतः देशमुख यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, आपण निवडणुकीतून माघार घेतली नसून आपल्यावर कोणाचाही दबाव नाही. केवळ प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण रुग्णालयात दाखल आहोत आणि आपला सर्वांशी संपर्क सुरू आहे. दरम्यान, आज त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. हर्षजित देशमुख हे 15 ते 20 कोटी रुपये घेऊन ‘मॅनेज’ झाले अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे 15 ते 20 कोटी रुपये घेऊन ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा असून, हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. देशमुख हे सध्या एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असून तिथूनच माध्यमांना मुलाखती देत असल्याचे समजल्याने ठाकूर यांनी या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीत घोडेबाजार सुरू यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असे मला कळले आहे. कोट्यवधी रूपायांचा व्यवहार होत असेल व एवढी कॅश इकडच्या तिकडे होत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला. तसेच हेमंत पाटील जे म्हणत आहे त्यांची गोष्ट खरी आहे, ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाही, संपूर्ण घोडेबाजार होत असून ही निवडणूक करप्ट होत आहे, याचा आम्ही निषेध करतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *