![]()
बांधकाम व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल याला लोणावळ्याजवळील किल्ले लोहगडावरून सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून दिल्याच्या खळबळजनक प्रकरणात तब्बल ७९ दिवसांनी पोलिसांनी आणखी एका संशयित साथीदाराला अटक केली आहे. या हत्येमध्ये केतनची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यासह रितेश हंगे (रा. बीड) याचाही सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. रितेश हा चेतनचा जवळचा मित्र आहे. सायबर फॉरेन्सिक तपासातून पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येबाबत चेतन, रितेश आणि सिया यांच्यात झालेले ऑडिओ संभाषण व मोबाइल चॅटिंगचा महत्त्वपूर्ण डेटा हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेले मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेट, पेनड्राइव्ह आणि हार्डडिस्क सायबर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तब्बल आठ हार्डडिस्कचे सखोल विश्लेषण करून मोठा डेटा मिळवला. या डेटाच्या आधारे चेतन आणि रितेश यांच्यातील संवाद, चॅटिंग व इतर डिजिटल पुराव्यांमधून तपासाला दिशा मिळाली आहे, तसेच रितेश हंगेच्या अटकेसाठीही हे पुरावे निर्णायक ठरले. डेटा कायमचा नष्ट होत नसला तरीही ‘ओव्हरराइट’ने पुनर्प्राप्तीची शक्यता कमी आरोपीने मोबाइलमधील माहिती डिलीट केली, तरी ती कायमची नष्ट होत नाही. मात्र, डिलीट केलेल्या डेटावर नवीन माहिती सेव्ह झाल्यास (ओव्हरराइट) तो मिळवण्याची शक्यता कमी होते. तरीही, उपलब्ध तांत्रिक साधनांनी चॅटिंग, लोकेशन आणि संपर्कांचे वर्गीकरण करून घटनाक्रम उभा करण्यास तपास यंत्रणेला मदत होते. – संदीप गदिया, सायबर तज्ज्ञ
Source link
हार्डडिस्कच्या विश्लेषणातून उलगडली केतनच्या खुनाची ‘डिजिटल लिंक’:चेतन-रितेश व सिया-रितेशमधील ऑडिओ, चॅटिंग पोलिसांच्या हाती