![]()
मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी १० दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान दारूबंदी लागू केल्याबद्दल पुणे प्रशासनावर जोरदार टीका केली. मुंबई व इतर भागांवर असे निर्बंध नसताना केवळ पुणे जिल्ह्यालाच का लक्ष्य केले जातेय. फक्त पुण्यातील लोकच दारू पिल्यावर गैरवर्तन करतात का, असा सवालही हायकोर्टाने केला. मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने प्रशासनाला ही बंदी मागे घ्या किंवा न्यायालयीन कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला. एकाच जिल्ह्यात अशी मनमानी करून प्रशासन पुणे व तेथील रहिवाशांना कलंकित करत आहे, असेही कोर्टाने नमूद केले. दरम्यान, न्यायालयाने फटकारल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने दहा दिवस दारू बंदीचा आदेश मागे घेतला. आता फक्त १४, २५ सप्टेंबरला ड्राय डे राहील. … तर मद्यपी रुग्णालयांत गर्दी करतील : हायकोर्ट परवानाधारकांना १० दिवसांसाठी त्यांचा व्यवसाय करण्यावर सरसकट बंदी घालणारा आदेश पारित केला जाऊ शकत नाही. अशा बंदीमुळे व्यसनी दारू पिणाऱ्यांना वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागेल. जर त्यांना १० दिवस प्यायला मिळालं नाही, तर ते रुग्णालयांमध्ये गर्दी करतील,’ असे मुख्य न्यायमूर्ती त्रिपाठी उपहासाने म्हणाले.
Source link
फक्त पुण्यातील लोकच दारू प्याल्यावर गैरवर्तन करतात का?:कोर्टाचा सवाल, पुण्यात गणेशोत्सवातील 10 दिवस दारूबंदीचे आदेश अखेर मागे