![]()
गणेशोत्सवाच्या काळात गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खिरापत वाटली जाते. यासाठी बाजारात ‘खोबरे पावडर’ला सर्वाधिक मागणी असते. याचाच फायदा घेत स्वस्त ‘कोकोनट पावडर’ पाकिटांमध्ये ३० ते ४० टक्के रवा आणि पिठीसाखर मिसळवून ती विकली जात आहे. यासाठी श्रीलंकेत आणि दक्षिण भारतात नारळाचे तेल काढल्यानंतर उरलेली पेंड स्वस्त दरात मागवली जाते. त्यात नारळाचा सुगंध, रवा आणि पिठीसाखर मिसळून ही पावडर तयार केली जाते. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि गुन्हा आहे. पाकिटाच्या दर्शनी भागावर ‘खोबरे पावडर’ असे ब्रँडिंग केले जाते. मात्र, छोट्या अक्षरांत पाकिटाच्या मागील बाजूला इंग्रेडिएंट्स (घटक) या रकान्यात रवा आणि साखर मिसळलेली असल्याचे लिहिले जाते. हा ‘मिसब्रँडिंग’ आणि फसवणुकीचा गुन्हा आहे.
Source link
बाप्पांच्या प्रसादासाठीच्या खिरापतीत खोबऱ्याच्या नावाने रव्याची भेसळ:गणेशोत्सवात खोबऱ्याच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा, भेसळीतून मिळवला जातो थेट 200 टक्के नफा