Headlines

हिंगोलीच्या भूमिपुत्राची गरुडझेप!:डॉ. सुशिलकुमार धनमने यांना रसायनशास्त्रात 5 पेटंट्स, भविष्यात कॅन्सरवर ठरू शकते प्रभावी औषध




हिंगोलीचे भूमिपुत्र असलेले सध्या फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. सुशिलकुमार धनमने यांनी रसायनशास्त्र या विषयांतील संशोधनामध्ये पाच पेटंट मिळवून अनोखा विक्रम प्राप्त केला आहे. डॉ. सुशिलकुमार धनमने यांनी रसायनशास्त्र या विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय पातळीवर नामांकन मिळवून आपल्या हिंगोली नगरीचे नाव उज्वल केले आहे. रसायनशास्त्र सारख्या विषयात औषध निर्मिती या संशोधनामध्ये राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाच पेटंट मिळवून एक वेगळा विक्रम प्रस्थापित करणारे डॉ. सुशिलकुमार धनमने हे पहिले प्राध्यापक ठरले आहेत. या शिवाय त्यांनी चार नवीन औषधी रेणूंचाही अभ्यास करून कॉपीराईट मिळवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. भविष्यामध्ये हे मॉलिक्युल्स कॅन्सर सारख्या रोगावर परिणामकारक औषध ठरतील असा दावा त्यांनी केला आहे. डॉ. धनमने यांचे संशोधनामध्ये राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर चाळीसहून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत. डॉ. धनमने सहा विद्यार्थ्यांना पीएचडी गाईड म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थ्यांनी पीएचडी मिळवली आहे. त्यांच्या अध्यापन कौशल्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने विविध विद्यापीठ, महाविद्यालय तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये दिलेली आहेत. त्यांच्या या कार्याचा म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर, पि टी. सार्वजनिक कॉलेज सुरत अशा विख्यात शिक्षण संस्थांच्या अभ्यास मंडळावर त्यांची सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे. हिंगोली येथील भारतीय विद्यामंदिर येथे प्राथमिक व त्यानंतर झालेले आदर्श महाविद्यालय हिंगोली महविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. विशेष प्राविण्यसह पदवी पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवून प्रथम क्रमांकाने एम. एससी उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी काही काळासाठी आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे या शिक्षण संस्थेमध्ये 2005 पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक कार्यातही त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढावं यासाठी त्यांनी “डॉ. सुशिलकुमार धनमने Specials” नात्यांची नौका असा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सुरू केला, जो स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *