![]()
फुलंब्री तालुक्यातील हिवरा येथे मंगळवारी शेतकऱ्यांच्या बांधावर दिवाळी : आनंदाची, आपुलकीची आणि मातीशी नाळ जोडणारी दिवाळी या प्रेरणादायी संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीतर्फे उपक्रम राबवण्यात आला. बळीराजाचा सन्मान करत आणि शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प घेत, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांच्या हस्ते हिवरा वाडी-वस्ती येथील गोसावी समाज आणि इतर शेतकरी वर्गासमवेत अत्यंत उत्साहात दीपावली साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी वस्तीवरील लहान मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पारंपरिक फराळाचा आस्वाद घेतला आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबीयांना आपुलकीची ऊब मिळाली. या सोहळ्यास गोसावी समाजाचे वयोवृद्ध मन्नू भावडू गोसावी यांच्यासह अशोक हिम्मत वाघ, जनार्दन सिसोदे, दत्ता शिसोदे, संजय राजपूत, अशोक वाघ, सुरेश शिसोदे, बंडू शिसोदे, सचिन मुळे, विठ्ठल राजपूत, विजय वाघ, विनोद भिवसने, रवी मस्के, अंकुश साळुंके आदींसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे हिवरा वाडी-वस्तीवरील शेतकरी कुटुंबांची यंदाची दिवाळी गोड आठवणींसह संस्मरणीय ठरली.
Source link
हिवरा येथे साजरी केली ‘पालावरची दिवाळी’