Headlines

होरनाडू कन्नड संघाचा 10 वा मेळावा: भाषा मन जिंकते:कन्नड भाषेला इतिहास आणि महत्त्व आहे, मेळाव्यात मान्यवरांचे उमटले सूर‎




कन्नड भाषेला इतिहास व महत्त्व आहे. आजही कन्नड संस्कृती दिसून येतो. मराठी राज्यात कन्नड शाळा आहेत. त्यामुळे ही भाषा समृध्द आहे, असे मत किरटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी यांनी व्यक्त केले. भाषा हे मन जिंकण्याचे साधन आहे. कन्नड बोलल्याने आपलेसे वाटते. त्यामुळे घरात कन्नड बोलले पाहिजे, असे मत माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केले. कर्नाटक विद्यावर्धक संघ, धारवाड व जिल्ह्यातील कन्नड संघाच्या वतीने होरनाडू कन्नड संघाच्या वतीने सोलापुरात १० वा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शनिवारी दिवसभर दोन परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झ्ाले. रविवारी दोन परिसंवाद, कवी संमेलन झाले. सायंकाळी मेळाव्याचा समारोप झाला. या मेळाव्यात १७ जणांचा सन्मान करण्यात आला. कर्नाटक राज्याबाहेरील कन्नड संघाच्या प्रतिनिधींचा १० वा महामेळावा शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. स्वामीनाथ महास्वामीजी यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कर्नाटक विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बेल्लद, सतीश तुरमारी आदी उपस्थित होते. शिवानंद गोगाव, सोमशेखर जमशेट्टी, रमेश नायक, अशोक उमराणीकर, शरणप्पा फुलारी, एन. ए. वाले, परमानंद अलगोंडा पाटील, गैबीशा मकानदार, के. एन. हुगार, शशिकला रामपुरे, राजश्री थळंगे, इंदूबाई लिंगाडे, लता ताळीकोटी, कविता पाटील यांचा गौरव करण्यात आला. वचनकार आणि समकालीनता- मीनाक्षी बाळी (कलबुर्गी) , सोन्नलगी सिध्दाराम- डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी मांडणी केली. मराठी साहित्यातील बंेद्रे यांचे योगदान – धारवाडचे आनंद झुजारवाड, कन्नड भाषेसाठी जयदेवी लिंगाडे यांचे योगदान- या विषयावर डॉ. रामकृ़ष्ण मराठी यांनी मांडणी केली. परराज्यातील कन्नड भाषिकांचे सुख- दु:ख या विषयावर परिसंवाद झाला. विविध राज्यातील कन्नड संघटनांचे प्रतिनिधींनी मत मांडले. मराठी व कन्नड अदान प्रदान या विषयावर डॉ. गुरुलिंगप्पा धबाली तर सोलापूरचा सांस्कृतिक वारसा या विषयावर डॉ. बी. बी. पुजार बोलले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *