![]()
तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि समाजात आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा’ उत्साहात प्रारंभ करण्यात आला. संस्थेच्या मुख्य प्रशासिका प्रकाशमणी य
.
प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शारदा खेडकर उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, व्यसनमुक्तीचा हा उपक्रम हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी महत्वाचा ठरेल. तर नगरसेवक विनोद मापारी यांनी स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांनाही या जीवघेण्या सवयींपासून परावृत्त करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात अकोला व वाशीम जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणी यांनी मनाच्या शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. राजयोगाच्या माध्यमातून मनावर नियंत्रण मिळवून कोणत्याही व्यसनावर सहज मात करता येते, असे सांगून निरोगी व चारित्र्यवान समाजासाठी राजयोग महत्वाचा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमास स्काऊट गाईडचे व्यवस्थापक किरण लहाने, जयामाला जाधव, मनिषा भंसाली, पोलिस अधीक्षक कार्यालयातील गोपाळ मुकुंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी किरण दीदी यांनी केले, तर आभार ब्रह्माकुमार डॉ. विकास भूगुल यांनी मानले.
२० वर्षांनी दिसतात व्यसनाचे घातक परिणाम प्रमुख वक्त्या डॉ. संजीवनी जवादे यांनी व्यसनाच्या गंभीर वैद्यकीय परिणामांवर प्रकाश टाकला. “कॅन्सरसारख्या भयानक आजाराचे बीज पहिल्यांदा व्यसन सुरू केल्यावरच पेरले जाते आणि त्याचे घातक परिणाम पुढील २० ते २५ वर्षांनंतर समोर येतात. एकाच्या व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्थ होते. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून लोकांना जागृत करणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे, असे ते म्हणाले.