![]()
राजस्थानी सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा स्थानिक खंडेलवाल भवनात पार पडली. संघाचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा उत्साहात संपन्न झाली.
.
सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्याला मंजुरी देण्यात आली, तसेच वार्षिक उत्पन्न व खर्चाच्या आढाव्यास मान्यता देण्यात आली. या वेळी वर्ष २०२६-२८ या कार्यकाळासाठी सर्वानुमते राजेश नवलचंद जैन यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. परंपरेनुसार या वर्षी अध्यक्षपद ओसवाल समाजाकडे असल्याने सेवाभावी राजेश जैन यांची या पदावर निवड झाली; सभेतील मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
नवनियुक्त अध्यक्ष राजेश जैन यांनी सर्व समाजांना सोबत घेऊन सेवा संघाच्या कार्याला अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. मावळते अध्यक्ष मनोज खंडेलवाल यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांची माहिती देऊन सहकाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी संघाचे माजी अध्यक्ष श्यामसुंदर खंडेलवाल, सिद्धार्थ शर्मा, निकेश गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, सचिव संजय खंडेलवाल व दीपक शर्मा उपस्थित होते. सिद्धार्थ शर्मा, नीकेश गुप्ता व ब्रिजमोहन चितलांगे यांनी राजस्थानी समाजाच्या सामाजिक एकतेवर भर देणारे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मावळते सचिव संजय खंडेलवाल यांनी केले. सभेला अग्रवाल समिती अध्यक्ष महेंद्र खेतान, दीपक गोयनका, श्यामसुंदर खंडेलवाल, सुनील वर्मा, रमेश राजोरिया, अजय सेंगर, भरत मिश्रा, देवेंद्र तिवारी, रतनलाल वर्मा, राजेंद्र बंब यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.