Headlines

अमोल मिटकरींची जय पवारांसाठी लॉबिंग:विधान परिषदेच्या जागेसाठी अप्रत्यक्षपणे सूचवले नाव; NCP च्या एका जागेसाठी 7 नावे चर्चेत

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेवर कुणाला पाठवणार? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पण तत्पूर्वीच आमदार अमोल मिटकरी यांनी या जागेसाठी जय पवार यांचे नाव सुचवून एकच धुरळा उडवून दिला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या…

Read Full News

पेडगाव शिवारात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ:हातातील कड्यावरून ओळख पटविण्याचे बासंबा पोलिसांचे प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील पेडगाव शिवारात लहान्या पुलाखाली मानवी सांगाडा सोमवारी ता. २७ सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सांगाड्याच्या हातामध्ये असलेल्या कड्यावरून आता त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न बासंबा पोलिसांनी सुरु केला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरमस ते पेडगाव शिवारात माळरानाचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या एका लहान्या पुला खाली मानवी सांगाडा असल्याचे…

Read Full News

PM मोदींचा आजपासून 2 दिवसांचा सिक्कीम दौरा:₹4000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी; राज्याच्या 50 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. ते राज्याच्या ५० व्या स्थापना दिनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. येथे ते ₹४००० कोटींहून अधिक प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. मोदी सोमवारी दुपारी ३ वाजता सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पोहोचतील. ते लिबिंग हेलिपॅडवरून गव्हर्नर हाऊस लोक भवनपर्यंत रोड शो करतील. १६ मे २०२५ रोजी सिक्कीमला राज्य…

Read Full News

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:आरोपी निदा खानच्या जामिनावर 2 मे रोजी निकाल; न्यायालयात सुनावणी पूर्ण

नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून, तो 2 मे रोजी दिला जाईल असे म्हटले आहे. ज्या 8 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यांपैकी निदा खान एक आहे. निदा खानने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला…

Read Full News

रिहानाच्या संघर्ष आणि यशाची न ऐकलेली कहाणी:गुजराण करण्यासाठी रस्त्यावर कपडे विकले, हिंसेची बळी ठरली, आज आहे ग्लोबल पॉप स्टार

पॉप स्टार रिहानाची गणना आज जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी कलाकारांमध्ये होत असली तरी, एक काळ असा होता की तिला रस्त्यावर कपडे विकावे लागले होते. तिचे जीवन खोलवर सामाजिक आणि आर्थिक संघर्षातून गेले आहे. सध्या ती तिच्या भारत भेटीमुळे चर्चेत आहे. चला, तिच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया. संघर्षाचा काळ – मानसिक तणावाशी झुंजली,…

Read Full News

विद्यार्थ्यांचे शुल्क 6% व्याजासह परत करा:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आयएलएस विधि महाविद्यालयाला निर्देश

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत पुण्यातील एका विद्यालयाला विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय,एल,एस, विधि महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी राज्य शासनाने ही भूमिका…

Read Full News

शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा:शिवप्रेमी मोठ्या मनाचे असतात, माफ करतील- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read Full News

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 57.8% मतदान:मतदानादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने जामनगर महानगरपालिकेत आपच्या उमेदवारासह 3 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये रविवारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 57.08% मतदानाची नोंद झाली आहे. यापैकी 15 महानगरपालिकांमध्ये 49%, 84 नगर परिषदांमध्ये 58.12%, 34 जिल्हा परिषदांमध्ये 60.21% आणि 260 तालुका पंचायतींमध्ये 61% मतदानाची नोंद झाली. मतमोजणी 28 एप्रिल रोजी होणार आहे. अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोट यासह 15 महानगरपालिका, 84 नगरपालिका,…

Read Full News

गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देण्याची मागणी:हिंगोलीत गौ सन्मान दिवसानिमित्त भव्य पदयात्रा

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा आणि त्यांच्या संरक्षण व सन्मानासाठी जनजागृती व्हावी, या उदात्त उद्देशाने आज हिंगोली शहरात ‘गौ सन्मान दिवस’ निमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी एकत्र येत गोवंश रक्षणाचा एल्गार पुकारला. या पदयात्रेची सुरुवात शहरातील ऐतिहासिक बद्रीनारायण मंदिर येथून करण्यात आली. भगवे ध्वज आणि गोमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर…

Read Full News

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये खालिस्तानी घोषणा:कॅनडात खालिस्तान समर्थक सुरक्षा कर्मचाऱ्यांना भिडले, गायकाला भाजप-आरएसएसचा एजंट म्हटले

पंजाबी आणि बॉलिवूड गायक दिलजीत दोसांझच्या कॅनडामध्ये झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गोंधळ निर्माण झाला. व्हँकुव्हरमध्ये झालेल्या ‘औरा-2026’ लाइव्ह कॉन्सर्टमध्ये खलिस्तान समर्थक पोहोचले आणि झेंडे दाखवून घोषणाबाजी करू लागले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, खलिस्तान समर्थकांनी त्यांच्याशीही वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक पोस्टर जारी करून दिलजीत दोसांझ यांना भाजप-आरएसएसचे एजंट म्हटले. दिलजीत परदेशात राहणाऱ्या…

Read Full News