Headlines

शिंदेंच्या शिवसेनेत विधान परिषद उमेदवारीचा पेच!:नीलम गोऱ्हे अन् बच्चू कडूंना पक्षांतर्गत तीव्र विरोध; नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रंगत आणली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही, तोच आता सर्वांचे लक्ष १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू असल्या तरी, संभाव्य उमेदवारांच्या नावावरून पक्षात मोठी नाराजी उफाळून…

Read More

भोंदू बागेश्वर महामानवांपेक्षा मोठा वाटतो का?:रोहित पवारांचा सवाल; म्हणाले – सत्तेतील मोठा पक्ष धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाचा स्पॉन्सर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे. त्यानंतरही नागपुरात या भोंदूबाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे हे लाजिरवाणे नाही का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे….

Read More

टॅक्सी चालकांना मराठी सक्ती:बैठकीतून मनसेला वगळलं म्हणजे माघार, देशपांडेंचा आरोप तर निरुपमांची वेळ देण्याची मागणी

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रालयात बैठक बोलावली असली, तरी या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निमंत्रण न दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकार मराठी सक्तीच्या भूमिकेवरून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचा…

Read More

आठवडी बाजार बंद करून भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव!:अंबादास दानवेंचा आरोप, संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपरिक आठवडी बाजार बंद करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. आठवडी बाजार बंद करून संबंधित भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज शहानुरवाडी येथे तीव्र निदर्शने केली. हा निर्णय रद्द करून गरिबांचा रोजगार वाचवावा, या मागणीसाठी ‘चला रे चला… बाजाराला चला’…

Read More

मंत्री प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया:भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा आरोप; कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल केली तक्रार

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सरनाईकांवर भाईंदर पाडा येथील एक महत्त्वाचा भूखंड लाटल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी एका फेसबुक पोस्टद्वारे मंत्री…

Read More

मुंबईत मरीन ड्राईव्हवर भयंकर अपघात:भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह 3 जण ठार; सिग्नलकडे दुर्लक्ष करणे भोवले

भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना सोमवारी पहाटे मुंबईतील मरीन ड्राईव्हवर घडली. दुचाकी चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी पहाटे 5.40 च्या सुमारास एन. एस. रोडवरील पारसी जिमखाना जंक्शन सिग्नलवर घडली. दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगात…

Read More

मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम:पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत; रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी मागितली वर्षाची मुदत

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते…

Read More

'केईएम'च्या नामांतरावरून राजकीय रणकंदन:मंत्री लोढांचा 'एकलव्य'चा प्रस्ताव; ठाकरेंच्या आमदारांचा विरोध, आंदोलनाचा इशारा

मुंबईतील ऐतिहासिक ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) रुग्णालयाचे नाव बदलून ते ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रस्तावामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने प्राथमिक मंजुरी दिल्याचे समजताच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याविरोधात रस्त्यावरच्या लढाईची हाक दिली आहे. या नामांतरामुळे मुंबईची अस्मिता आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत…

Read More

The school turned mothers into teachers; now children are learning math in the kitchen!

Marathi News National The School Turned Mothers Into Teachers; Now Children Are Learning Math In The Kitchen! बबिता माली | पूर्व मेदिनीपूर22 तासांपूर्वी कॉपी लिंक माता मुलांना विविध भाषांतून वस्तूंची नावे, दैनंदिन शब्द शिकवू लागल्या आहेत. वर्गात प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता सारखी नसते. काही मुले पटकन शिकतात, तर काहींना थोडा अधिक वेळ लागतो. अशा परिस्थितीत…

Read More

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण प्रस्ताव रद्द करा:संभाजीनगरमध्ये 'आरक्षण बचाव' कृती समितीचा मोर्चा, सरकारविरोधात घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘आरक्षण बचाव कृती समिती’ने अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनुसूचित जातीतील विविध घटक, सामाजिक संघटना, आंबेडकरी कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने…

Read More