Headlines

खरातचा चेहरा, दैवी शक्तीचा बनाव रचून महिलेवर चार वेळा बलात्कार:सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; गुंगीचे औषध देऊन अत्याचार

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ (६७) याच्या पापाचा पाढा आता वाचला जात आहे. जादूटोणा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका पीडितेवर तब्बल चार वेळा बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रक . तपासातील महत्त्वाचे मुद्दे गूढ ‘रिंग मेकर’ घटनास्थळावरून बोटांच्या अंगठीचे माप घेणारी ३५ गोलाकार स्टीलची मापे जप्त…

Read Full News

पुण्यात मशरूम कंपनीत टाकीतील विषारी वायूमुळे 3 कामगारांचा मृत्यू:सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरले होते, मृत उत्तर प्रदेशचे

जेजुरीजवळील बेलसर गावातील एका मशरूम उत्पादक कंपनीत तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. कंपनीच्या आवारातील सांडपाण्याची भूमिगत टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगारांना टाकीत साचलेल्या विषारी वायूचा फटका बसला आणि काही क्षणांतच ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून औद्योगिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुर्घटनेत पिंटू राजेश…

Read Full News

Iran’s double game; Don’t stop nuclear program, we will open Hormuz, tanker with 12 Indian crew attacked in Hormuz

Marathi News National Iran’s Double Game; Don’t Stop Nuclear Program, We Will Open Hormuz, Tanker With 12 Indian Crew Attacked In Hormuz तेहरान/नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इराण आता डबल गेम खेळत आहे. त्याने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला तीन पॉइंट्सचा शांतता प्रस्ताव दिला आहे. इराणने म्हटले आहे की जर अमेरिकेने त्यांच्या अणुकार्यक्रमावर बंदी घालण्याचा हट्ट सोडला,…

Read Full News

उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करा; अन्यथा मंत्रालयावर धडक मोर्चा:आरक्षणाची मर्यादा 13 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याची मागणी

अनुसूचित जाती आरक्षणातील प्रस्तावित ‘उपवर्गीकरण’ निर्णयाच्या विरोधात आरक्षण बचाव कृती समितीने पुकारलेल्या एल्गारामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आज दणाणून गेले होते. आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात अनुसूचित ज . संवैधानिक मूल्यांशी तडजोड नाही मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांनी हातात ‘उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) रद्द करा’ असे लिहिलेले फलक धरले होते. उपवर्गीकरण…

Read Full News

Banda Records 47.60°C Highest Temp in India; Yellow Alert for 8 Maharashtra Districts

Marathi News National Banda Records 47.60°C Highest Temp In India; Yellow Alert For 8 Maharashtra Districts अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली-पुणे3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्रात मे महिना म्हणजे भीषण उष्णतेचा प्रकोप मानला जातो. मात्र यंदा वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातच महाराष्ट्र भाजून निघत आहे. छत्रपती संभाजीनगरात रविवारी या हंगामासह सात वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 43.4 अंश सेल्सियस…

Read Full News

पुणे पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई:१९ जण अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५८ लाख १८ हजार २५० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, १ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत परिमंडळ ७ अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिमंडळ ७ मधील वाघोली, लोणीकंद,…

Read Full News

299 रुपयांचा ऑनलाइन ड्रेस पडला 1 लाखाला, मुंबईमध्ये नर्सला गंडा:सोशल मीडियावरील जाहिरात पाहून महिलेने केला होता ड्रेस बुक

ऑनलाइन माध्यमातून अवघ्या २९९ रुपयांचा ड्रेस खरेदी करण्याच्या नादात मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेची १ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. देवनार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील जाहिरात, व्हॉट्सॲप क्रमांक आणि बनावट डिलिव्हरी एजंटच्या माध्यमातून ही सायबर फसवणूक करण्यात आली. येथील एका वसतिगृहात राहणाऱ्या परिचारिकेने सोशल मीडियावर २९९ रुपयांत ड्रेसची जाहिरात…

Read Full News

सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास

देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. मात्र, या इंजेक्शन्सचा वापर जितका सोपा वाटतो, तितकाच तो जोखमीचा आहे. वैद्यकीय संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स घेणाऱ्या दर दोनपैकी एका व्यक्तीला (५०%) कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा…

Read Full News

Mumbai Family Death: Biryani & Watermelon Tragedy

मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या भीषण विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींचा समावेश असून, या . पायधुनीतील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत जेवण केले. मिळालेल्या…

Read Full News

संजय गायकवाडांच्या धमकीचा उलटा परिणाम!:'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या प्रतींची 4 दिवसांत मोठी विक्री, पुनर्मुद्रण सुरू

दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून महाराष्ट्रात सध्या मोठे राजकीय वादळ उठले आहे. मात्र, या वादाचा एक अनपेक्षित परिणाम समोर आला असून, अवघ्या चार दिवसांत या पुस्तकाच्या १० हजारहून अधिक प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी…

Read Full News