Headlines

Iran’s double game; Don’t stop nuclear program, we will open Hormuz, tanker with 12 Indian crew attacked in Hormuz


  • Marathi News
  • National
  • Iran’s Double Game; Don’t Stop Nuclear Program, We Will Open Hormuz, Tanker With 12 Indian Crew Attacked In Hormuz

तेहरान/नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

इराण आता डबल गेम खेळत आहे. त्याने पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला तीन पॉइंट्सचा शांतता प्रस्ताव दिला आहे. इराणने म्हटले आहे की जर अमेरिकेने त्यांच्या अणुकार्यक्रमावर बंदी घालण्याचा हट्ट सोडला, तर ते होर्मुझ खुले करण्यास तयार आहेत. शांतता प्रस्तावाचा दुसरा पॉइंट पूर्ण युद्धविराम आणि भविष्यात अमेरिका किंवा इस्रायलकडून लष्करी कारवाई रोखण्याची हमी देणे हा आहे. तिसरा पॉइंट होर्मुझमधून अमेरिकन लष्करी नाकेबंदी संपवणे हा आहे.

इराणने म्हटले आहे की, तिन्ही पॉइंट्सवर टप्प्याटप्प्याने काम व्हावे. यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, इराणला सर्वात आधी होर्मुझ खुले करावे लागेल. दुसरीकडे, होर्मुझमध्ये अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे अस्वस्थ झालेल्या इराणने २५ एप्रिल रोजी टोगोचा ध्वज असलेल्या एका टँकरवर हल्ला केला. भारतीय नौवहन मंत्रालयाने म्हटले आहे की टँकरवरील १२ भारतीय क्रू सदस्य सुरक्षित आहेत.

इराणच्या खार्ग बेटावर स्टोअरेज फुल, आता ३० वर्षे जुन्या जहाजात तेल ठेवताहेत

होर्मुझमधील अमेरिकेची नाकेबंदी इराणला भारी पडत आहे. अमेरिकन सेंटकॉमच्या मते, आतापर्यंत ३८ इराणी टँकर्सना परत पाठवण्यात आले आहे. होर्मुझमध्ये खार्ग बेटावर इराण आपले ९०% तेल काढतो. येथे इराणकडे ३० दशलक्ष बॅरल साठवणुकीची क्षमता आहे, जी जवळपास फुल झाली आहे. अशा स्थितीत आता इराणसमोर स्टोअरेजचे संकट उभे राहिले आहे. इराण आपले ३० वर्षे जुने जहाज ‘नाशा’ वापरत आहे. हे टँकर तसे सेवा पूर्ण करून निवृत्त झाले आहे, पण इराणकडे या टँकरमध्ये तेल साठवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. इतर जुन्या जहाजांचाही शोध घेतला जात आहे, ज्यामध्ये तेल साठवले जाऊ शकेल.

इराणचा तेल व्यवसाय

इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे बहुतांश देश त्याच्याकडून तेल खरेदी करत नाहीत. इराणचा सर्वात मोठा खरेदीदार चीन आहे. इराण आपल्या तेलाच्या जहाजांना शॅडो फ्लीट बनवून खुल्या समुद्रात उतरवतो.

चाबहार पोर्टवर मिळालेली अमेरिकन निर्बंधांतील सूट संपली, भारत म्हणाला- चर्चा सुरू

इराणच्या चाबहार पोर्टवर मिळालेली सूट २६ एप्रिल रोजी संपुष्टात आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले, याबाबत अमेरिका व इराणसोबत चर्चा सुरू आहे. अमेरिकेने सप्टेंबरमध्ये भारताला २६ एप्रिलपर्यंत चाबहार पोर्टमध्ये कामाची सूट दिली होती. विशेष म्हणजे, भारताची या पोर्टमध्ये ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. होर्मुझजवळ स्थित चाबहार पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडते.

इराणचे परराष्ट्रमंत्री अरागची यांना भेटले रशियाचेराष्ट्राध्यक्ष पुतीन, म्हणाले – आम्ही शांततेच्या बाजूने

मॉस्को | इराणची ‘शटल डिप्लोमसी’ सुरूच आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची सोमवारी संध्याकाळी रशियात पोहोचले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. पुतीन म्हणाले की, रशियाला आशा आहे की इराणी जनता सध्याच्या कठीण परिस्थितीचा सामना करेल. रशिया इराण आणि क्षेत्रातील इतर देशांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. रशिया शांततेच्या बाजूने आहे. विशेष म्हणजे, परराष्ट्रमंत्री अरागची आधी पाकहून ओमान, पुन्हा पाकिस्तान व त्यानंतर आता रशियात पोहोचले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *