Headlines

योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही:प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू; बकरीदच्या एक आठवडा आधी इशारा

यूपीमध्ये बकरीदच्या एक आठवडा आधी रस्त्यांवर नमाज पठणाबाबत मुख्यमंत्री योगींनी कठोर इशारा दिला. सोमवारी लखनऊमधील एका कार्यक्रमात ते म्हणाले- रस्त्यावर नमाज पठण करू दिले जाणार नाही. प्रेमाने ऐकले तर ठीक आहे, नाही ऐकले तर दुसरा मार्ग अवलंबला जाईल. योगी म्हणाले- नमाज अदा करायची असेल तर ठरलेल्या ठिकाणी करा. संख्या जास्त असेल तर शिफ्टमध्ये अदा करा….

Read More

गाडीत डिझेल नाही, मुलीला कसे शोधणार?:बेपत्ता मुलीला शोधण्याची मागणी करणाऱ्या कुटुंबाला नागपूर पोलिसांचे उत्तर; काँग्रेसचा घणाघात

एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी गाडीत डिझेल नसल्यामुळे तिला शोधण्याची जबाबदारी झटकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. देशाला अमृतकालची स्वप्ने दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीत आज पोलिस स्टेशनची गाडी डिझेल अभावी बंद पडतेय. हा अमृतकाल नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचा काळ आहे, अशी टीका काँग्रेसने या प्रकरणी केली आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक मुलगी…

Read More

कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला:जुन्या वादातून तिघांनी केली मारहाण; आरोपींचा शोध सुरू

पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ सोमवारी सकाळी एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सोमवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे)…

Read More

20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशभर बंद:ऑनलाईन विक्री आणि कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात आंदोलन

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेते यात सहभागी होतील, अशी माहिती ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने पत्रकार परिषदेत दिली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की,…

Read More

अमिगो ॲकॅडमीकडून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक:राज्य सरकारने कारवाई करावी; सुनील माने यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी पुण्यातील ‘अमिगो ॲकॅडमी’वर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विमान कर्मचारी, आतिथ्य व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. माने यांनी राज्य सरकारने या संस्थेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनील…

Read More

'देवस्थान इनाम निर्मूलन' कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे आक्रमक:पुण्यात राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा; कायदा मागे घेण्याची मागणी

राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ या कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरांच्या विश्वस्तांनी तीव्र भूमिका घेतली आहे. हा कायदा हिंदू मंदिरांची स्वायत्तता आणि ऐतिहासिक वारसा धोक्यात आणत असल्याचा आरोप करत, तो तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा अष्टविनायक मंदिरे समितीने पुण्यात दिला आहे. पुण्यात…

Read More

अभिनेत्री अमृता सुभाष यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार:बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय दरवर्षी देतात हा पुरस्कार

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (थत्ते) यांनी ही माहिती दिली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता…

Read More

हौसेला मोल नाही:कोल्हापूरच्या हौशी सासऱ्याने अधिक मासात जावयाला दिली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल; किंमत काय?

जावयावर प्रेम किती असावे, याचे अनोखे उदाहरण कोल्हापुरात पाहावयास मिळाले आहे. येथील एका हौशी सासऱ्याने आपल्या परदेशात राहणाऱ्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची खास कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. पारंपरिक कलाकुसर व आधुनिक थाट यांचा संगम असलेल्या चप्पलीची चर्चा सध्या येथील पंचक्रोशीत रंगली आहे. हिंदू संस्कृतीत अधिक मासाला अत्यंत पवित्र व धार्मिक महत्त्व आहे. या…

Read More

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'हिरकणी' अखेर सुरक्षित!:10 दिवसांच्या चिंतेनंतर वन विभागाला मोठा दिलासा, मात्र गळ्यातील 'सॅटेलाइट पट्टा' बेपत्ता

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध ‘हिरकणी’ (STR T6) वाघिणीच्या सुरक्षेबाबत गेल्या 10 दिवसांपासून निर्माण झालेली चिंता अखेर मिटली आहे. वन्यजीव विभागाने लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्यात हिरकणी नुकतीच कैद झाली असून, ती अत्यंत सुदृढ स्थितीत असल्याची आनंददायी माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या गळ्यातील उपग्रह संचलित स्थानदर्शक पट्टा (सॅटेलाइट जीपीएस कॉलर) गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ​मागील 10…

Read More

शेतकऱ्यांचे तीन दिवसांपासून नाल्यात ठिय्या आंदोलन:कंजारा येथे नाला सरळीकरण करण्याची मागणी, पावसामुळे होतेय ३०० एकर क्षेत्राचे नुकसान

औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील नाल्याचे खोलीकरण करून सरळीकरण करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून नाल्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व कंजारा माळरानावरून मोठ्या नाल्याचा उगम आहे. या नाल्याचे पाणी कंजारा शिवारातून पुढे कयाधू…

Read More