Headlines

श्री शिवाई देवी संस्थानला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा:जिल्हा परिषद सीईओंच्या प्रस्तावास मिळाली मंजुरी‎

प्रतिनिधी । सिल्लोड/ शिवना अवघ्या तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील ग्रामदैवत आई श्री. शिवाई देवी संस्थानला आता शासनातर्फे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थस्थळाचा “क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संस्थानतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास…

Read More

बिहारमधील सासाराममध्ये ट्रेनच्या जनरल डब्याला आग:सर्व प्रवासी सुरक्षित; काल त्रिवेंद्रम-दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागली होती

बिहारमधील सासाराममध्ये भभुआ-सासाराम-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 53212) मध्ये सोमवारी अचानक आग लागली. आग ट्रेनच्या जनरल बोगी D3 मध्ये लागली होती. त्यानंतर बोगीमधून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्या. घटनेच्या वेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती. आग लागताच प्रवाशांमध्ये पळापळ सुरू झाली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी घाईघाईने ट्रेनमधून उतरू लागले. अनेक प्रवाशांनी आपले सामान सोडून प्लॅटफॉर्मकडे…

Read More

कन्नड शहरामध्ये ७० सीसीटीव्ही:पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष सुरू

प्रतिनिधी | कन्नड महाभारतात संजयने युद्धस्थळावरून जसे वार्तांकन केले, तसेच काम आता अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे करतील, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी १६ रोजी सांगितले. कन्नड शहर पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सहा कोटी जिल्हा नियोजन विकास निधीतून आमदार संजना जाधव यांच्या मागणीची पूर्तता झाली. शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ७० सीसीटीव्ही कॅमेरे…

Read More

पैठण शहरामध्ये शनी अमावास्येनिमित्त महामस्तक अभिषेक महोत्सव उत्साहात:हजारो भाविकांनी घेतले भगवान मुनिसुव्रतनाथांचे दर्शन‎

प्रतिनिधी | पैठण येथील श्री शनिग्रह अरिष्ट निवारक मुनिसुव्रतनाथ भगवान क्षेत्र येथे शनिअमावस्येनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य महामस्तक अभिषेक महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. भारतातील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मूलनायक भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या महामस्तक अभिषेकासाठी राज्यासह देशभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. हा सोहळा बुंदेलखंड केसरी आचार्य श्री…

Read More

कौंदर येथील सप्ताहाची काल्याने सांगता:नवले महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले

प्रतिनिधी | दावरवाडी “भक्ताच्या अंतःकरणात जर दृढ विश्वासाचे आणि भक्तीचे बळ असेल, तर त्याची बुद्धी विचलित न होता स्थिर होते. हीच स्थिर बुद्धी माणसाला हरीच्या चरणी लीन करते. ज्याच्या हृदयात ईश्वरी नामाचा प्रकाश आहे, त्याला संपूर्ण चराचरात ईश्वराचेच रूप दिसते,’ असे प्रतिपादन कीर्तनकार कृष्णा महाराज नवले यांनी केले. पैठण तालुक्यातील कौंदर येथे शन्नैश्वर जयंतीनिमित्त आयोजित…

Read More

Vehicles Vandalized, 3 Cops Injured; Mamata Rejects Bulldozer Politics

Marathi News National Kolkata Violence: Vehicles Vandalized, 3 Cops Injured; Mamata Rejects Bulldozer Politics कोलकाता38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कोलकातामध्ये रविवारी पार्क सर्कस परिसरात अतिक्रमण हटवण्याविरोधात लोकांनी निदर्शने केली. यावेळी पोलिसांवर दगडफेकही झाली, ज्यात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. सुरक्षा दलांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. पार्क सर्कस सेवन पॉइंट क्रॉसिंगजवळ मोठ्या संख्येने लोक अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या विरोधात…

Read More

बालानगर परिसरात पाणीटंचाई:पाने पिवळी पडून पिके करपू लागली

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील ववा, वडाळा, कासार पाडळीसह बालानगर परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. शेतीपंपासाठी वीजपुरवठा अनियमित आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक शेतातील पिकांची पाने पिवळी पडली आहेत. ती करपू लागली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली…

Read More

शासकीय आदेश निघूनही वाळू वाहतूक ठप्प; प्रशासनाचा सावळा गोंधळ कायम:डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा डेपोचे लाखो रुपये भरूनही गाड्या बंदच‎

प्रतिनिधी | वैजापूर तालुक्यात सध्या टेंडर शिल्लक वाळूचे, पण नजर मात्र गोदावरीच्या नव्या वाळूवर. अशी एकच चर्चा रंगू लागली आहे. तालुक्यातील डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा येथील वाळू डेपोचे टेंडर पूर्ण झाले. ठेकेदारांनी लाखोंची चलने भरली. शासनाचे आदेशही निघाले. वाहतुकीची तारीखही निश्चित झाली. मात्र, एवढी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष वाळू वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही….

Read More

व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी मुलींच्या वसतिगृहाला दिली ५,७४८ पुस्तके भेट:छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राबवला उपक्रम‎

प्रतिनिधी | खंडाळा मराठा सेवा संघाच्या वतीने आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित संत तुकोबाराय व्याख्यानमालेत एका स्तुत्य उपक्रमाची नोंद झाली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या अंतर्गत, १६ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ मंदिर येथे वक्ते प्रदीप सोळुंके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वक्ते प्रदीप सोळुंके यांनी…

Read More

जम्मू-काश्मीरमधील 13% लोकसंख्या ड्रग्सच्या आहारी:पंजाब आणि सीमेपलीकडून येते ड्रग्स; ड्रग्स माफियांना आवर घालण्यासाठी 100 दिवसांची मोहीम

पंजाबनंतर जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांचे नवीन केंद्र म्हणून समोर आले आहे. सरकारी अंदाजानुसार, राज्याच्या 1.3 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 13.5 लाख लोक (13% पेक्षा जास्त) अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. 2022 मध्ये हा आकडा सुमारे 6 लाख होता. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दहशतवादासोबतच आता अंमली पदार्थांचे जाळे देखील मोठे आव्हान बनून उभे राहिले आहे. डीजीपी नलिन प्रभात…

Read More