Headlines

राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी घेतले श्री घृष्णेश्वराचे दर्शन:खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात जाऊन दर्शन

वेरूळ | राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग व खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमीर जेतपूरवाला, शिवालय प्रतिष्ठान वेरूळचे सुनील लोखंडे, सतीश फुलारे, गोविंद काकडे, निखिल आव्हाड, सनी शिंदे व सचिन सुदाम उपस्थित होते. श्री…

Read More

पैठणचे उद्यान ४९ वर्षांसाठी देणार भाडेतत्त्वावर:२३२ हेक्टरवर होणार जागतिक पर्यटन प्रकल्प

जायकवाडी धरण परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान, ॲडव्हेंचर पार्क, डाउनस्ट्रीम भागाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २३२ हेक्टर क्षेत्र ४९ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कराराद्वारे खासगी विकासकाकडे सोपवण्यात येणार आहे. जागतिक दर्जाचे जलपर्यटन व पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे….

Read More

केळगाव प्रकल्पातून अवैध पाणी उपसा:परिसरात गावांना टंचाईची भीती

सिल्लोड | तालुक्यातील केळगाव प्रकल्पातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असून, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे. केळगाव प्रकल्पातून अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदी गावांची तहान भागवली जाते. मात्र या प्रकल्पातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावत आहे. संबंधित…

Read More

व्ही.डी. सतीशन आज केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील:6 पक्षांचे 21 आमदार मंत्री होतील, यापैकी काँग्रेसचे 12; राहुल-प्रियांका उपस्थित राहणार

काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन (61) आज केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळा तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्यांच्यासोबत 20 मंत्र्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळही शपथ घेईल. या कार्यक्रमात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित राहतील. शशी थरूर परदेशात असल्याने उपस्थित राहणार नाहीत. सतीशन हे सलग 6 वेळा पारावूर…

Read More

आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आमठणा-खातखेडा रस्त्याचे भूमिपूजन:प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर

बोरगाव बाजार | आमठणा-बोरगाव-खातखेडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून, या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळापासून या रस्त्याची अवस्था खराब झाल्याने ग्रामस्थ, शेतकरी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच सय्यद सत्तार, केशवराव तायडे, अर्जून…

Read More

शिवसेना उबाठाच्या खुलताबाद शहर प्रमुखपदी मुकेश मालोदे यांची नियुक्ती:पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना

खुलताबाद | शिवसेना (उबाठा) शहर प्रमुखपदी मुकेश मालोदे यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी विरोेधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे खुलताबाद शहरातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना (उबाठा)चे मराठवाडा संपर्कप्रमुख सुभाष पाटील,…

Read More

दरेगावात शेतरस्त्याच्या कामाचे झाले भूमिपूजन:अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास

प्रतिनिधी | खुलताबाद शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजनेअंतर्गत दरेगाव येथील बोरीचा मळा ते बेंडखोरा शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. बाजार सावंगी जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा विकास कापसे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास होत…

Read More

टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीतील गुणवंतांचा सत्कार:सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांना नवप्रेरणा मिळावी यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम…

Read More

बेगमपुऱ्याच्या इतिहासाची हेरिटेज वॉकमध्ये उलगडली पाने:थत्ते हौद ते कुंभारगल्ली : बेगमपुरा हेरिटेज वॉकमध्ये 250 हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक सफर

ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने रविवारी (१७ मे) सकाळी ‘बेगमपुरा हेरिटेज वॉक’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आणि ‘इन्टॅक’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या शहराच्या वेशीबाहेर वसलेल्या बेगमपुरा भागातील जिवंत इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी तब्बल २५० हून अधिक सजग नागरिक या सफरीमध्ये…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘डॅमेज कंट्रोल’:खासदार पार्थ पवार – फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट

राष्ट्रवादीमधील संघटनात्मक फेरबदल व नवी पिढी खासदार पार्थ व जय पवारांकडे आर्थिक व प्रशासकीय सूत्रे एकवटल्याने ज्येष्ठ नेत्यांत निर्माण झालेल्या तीव्र नाराजीचा फटका बसू नये यासाठी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. शनिवारी उशिरा ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री व पार्थ यांच्यात बैठक पार पडली. दरम्यान, या भेटीत काही प्रशासकीय व राजकीय…

Read More