Headlines

जिल्ह्यातील भोंदू डॉक्टर शोधून कारवाई करा:आमदार संग्राम जगताप

प्रतिनिधी | अहिल्यानगर अहिल्यानगर शहर व जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी किंवा ज्ञान नसताना सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळेच या भोंदू डॉक्टरांचे फावले असून, शासनाने या संपूर्ण प्रकरणाची कडक कलमांखाली चौकशी करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

आर्थिक अडवणुकीवर शिक्षकांच्या संघटनांनी वेधले लक्ष:शहरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विशेष बैठकीत जाणून घेतल्या सर्वांच्या अडचणी‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण विभागातील फायली मंजुरीसाठी केली जाणारी अडवणूक, आर्थिक व्यवहारांसाठी होणारा छळ आणि महिला कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा या गंभीर तक्रारींवरून अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनांनी थेट नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित विशेष बैठकीत हा शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. संबंधित कार्यालयीन…

Read More

अशोक खरातचा 52 कोटींचा महाघोटाळा:65 बनावट खाती अन् परदेशात पलायनाचा प्लॅन उघड, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा समोर आला असून, त्याने अटकेपूर्वी बनावट आणि बेनामी खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये म्हणून खरातने बँकिंग नियमांमधील 2 लाख रुपयांच्या मर्यादेची पळवाट शोधली होती. अवघ्या तीन महिन्यांत या बेनामी खात्यांमधून तब्बल 52 कोटी रुपये…

Read More

प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम,‎ रस्ते पॅचिंगकडे मनपाचे दुर्लक्ष‎:आंदोलनाच्या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर मध्य शहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम आहेत. पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केलेली नाही. सावेडी उपनगरातील भाजप नगरसेवकांनी दहा दिवसांपूर्वी महापालिकेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर पडला आहे. परिणामी, नागरिकांना अद्यापही खड्ड्यांचे दणके सोसावे लागत…

Read More

शेतकऱ्यांवर मोठा अन्याय:उत्पादन खर्च 20 रुपये अन् खरेदी दर फक्त साडेबारा रुपये, लासलगावातून रोहित पवार आक्रमक

केंद्र सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1235 रुपये (12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो) या अत्यंत तोकड्या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा खरेदी दर अत्यंत अपुरा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार…

Read More

सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 74,500 वर:रुपया प्रथमच 96.18 वर पोहोचला; कच्चे तेलही 110 डॉलरच्या पुढे गेले

मध्य पूर्वेकडील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे आज सोमवार, 18 मे रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 74,500 वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 220 अंकांनी खाली आहे, तो 23,400 वर आला आहे. याव्यतिरिक्त, कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 110 डॉलरच्या पुढे गेली आहे. तर, डॉलरच्या तुलनेत…

Read More

प्रामाणिकपणे रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांची आज गरज -पारगावकर:जनकल्याण रक्तकेंद्रातर्फे ६० हून अधिक शिबीर संयोजकांचा गौरव‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर “विज्ञानाने आज प्रगती करून कृत्रिम हृदय तयार केले असले, तरी ते चालवणारे रक्त अद्याप विज्ञान प्रयोगशाळेत बनवू शकलेले नाही. रक्ताची गरज केवळ आणि केवळ मानवी रक्तदानातूनच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कर्तव्याच्या भावनेने रक्तदान करणाऱ्यांइतकीच, प्रामाणिकपणे रक्त संकलन आणि पुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांची आज समाजाला गरज आहे. जनकल्याण रक्तपेढी हे सेवाकार्य सक्षमपणे करत आहे,”…

Read More

जयंत पाटलांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर:म्हणाले- ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देतायत

ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देतायत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या टंचाईवरून तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

MP-Rajasthan Heatwave: 22 Cities Above 43°C; UPs Banda Hottest at 46.4°C

Marathi News National MP Rajasthan Heatwave: 22 Cities Above 43°C; UPs Banda Hottest At 46.4°C | Bihar Students Faint नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ1 तासापूर्वी कॉपी लिंक देशातील अनेक राज्ये तीव्र उष्णतेने होरपळत आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा रविवारी 46.4°C तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. झांसीमध्ये 44.6°C आणि प्रयागराजमध्ये 44.5°C तापमानाची नोंद झाली. राजधानी लखनऊमध्ये 41.6°C तापमान होते,…

Read More

महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी!:पृथ्वीराज मोहोळने दुखापतीनंतर घेतली माघार; कुस्तीच्या आखाड्यात नेमके काय घडले? वाचा सविस्तर

सातारामधील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या 52 व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत वाद पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात ही लढत पार पडणार होती. मात्र, कुस्ती सुरू झाल्यानंतर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने डाव टाकला तेव्हा पृथ्वीराजच्या हाताला इजा झाली. त्याला हात हलवताही येत नसल्याने त्याने माघार घेतली. त्यानंतर…

Read More