Headlines

पैठण शहरामध्ये शनी अमावास्येनिमित्त महामस्तक अभिषेक महोत्सव उत्साहात:हजारो भाविकांनी घेतले भगवान मुनिसुव्रतनाथांचे दर्शन‎




प्रतिनिधी | पैठण येथील श्री शनिग्रह अरिष्ट निवारक मुनिसुव्रतनाथ भगवान क्षेत्र येथे शनिअमावस्येनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य महामस्तक अभिषेक महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. भारतातील जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मूलनायक भगवान मुनिसुव्रतनाथ यांच्या महामस्तक अभिषेकासाठी राज्यासह देशभरातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. हा सोहळा बुंदेलखंड केसरी आचार्य श्री १०८ सिद्धांतसागरजी महाराज व प्रशांतमूर्ती आचार्य श्री १०८ गुनभद्रनंदीजी महाराज ससंघ यांच्या पावन सान्निध्यात तसेच अंतर्मना आचार्य श्री १०८ प्रसन्नसागरजी महाराज यांच्या आशिर्वादाने पार पडला. सकाळी भगवान मुनिसुव्रतनाथ विधान, धर्मध्वजारोहण व महामस्तक अभिषेक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडले. जयघोष, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण तीर्थक्षेत्र मंगलमय झाले होते. विविध अभिषेक व धार्मिक विधींमध्ये देशभरातील भाविकांनी सहभाग घेतला. या प्रसंगी देवेंद्र स्नेहदेवी सूरजमल, अमित बडजाते, निलम अजमेरा, रतनलाल पहाडिया, विनय सुरथेधाने, अशोक जैन व मनोज चौधरी आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महावीर बडजाते, विलास पहाडे,विजय पापडीवाल, जयकुमार बाकलीवाल, प्रमोद कासलीवाल, मनोज काला, प्रकाश कासलीवाल, कैलास पाटणी, किशोर भाकरे, सुमीत गंगवाल, डॉ. संजय गंगवाल, डॉ. राजेंद्र काला, स्वदेश पांडे व अभिजीत काला यांच्यासह विश्वस्त मंडळाने विशेष परिश्रम घेतले. या महोत्सवासाठी जयपूर, राजस्थान, दिल्ली आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. जीवनातून संयम, त्याग यांचा आदर्श घ्यावा ः आचार्य श्री १०८ सिद्धांतसागरजी महाराज धर्मसभेत मार्गदर्शन करताना आचार्य श्री १०८ सिद्धांतसागरजी महाराज म्हणाले, ‘मनुष्य जीवन हे धर्म, संयम आणि साधनेसाठी मिळालेले अमूल्य वरदान आहे. बाह्य सुखाच्या मागे धावताना माणूस आत्मशांतीपासून दूर जात आहे. भगवान मुनिसुव्रतनाथांच्या जीवनातून संयम, क्षमा आणि त्याग यांचा आदर्श घ्यावा. ग्रहदोषापेक्षा कर्मदोष मोठा असून चांगल्या कर्मांनीच जीवन मंगलमय होते.‘ तर आचार्य श्री १०८ गुनभद्रनंदीजी महाराज यांनीही मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *