चिंचखेडा बु. येथे सीआरटी प्रात्यक्षिक, जनजागृती मोहीमेची बैठक उत्साहात:कि़डींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कन्नड तालुक्यातील चिंचखेडा बु. येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शुक्रवारी सीआरटी प्रात्यक्षिक व जनजागृती मोहिम उत्साहात पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले की, मे व जून महिन्यात पिकणाऱ्या कडुलिंबाच्या निंबोळ्या जमा करून सुकवल्यानंतर त्यापासून निंबोळी अर्क तयार केला जातो. निंबोळी अर्काच्या उग्र वासामुळे किडी व अळीवर्गीय कीटक अंडी घालण्याचे टाळतात. त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावावर प्रभावी…