बहुजन हक्क परिषद:शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला, वणीमध्ये सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात
वंचित बहुजन आघाडी दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बहुजन हक्क निर्धार परिषद शुक्रवारी (दि. १५) येथील खुशी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण हा गरिबांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न असून सरकारने शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला…