Headlines

पेट्रोल-डिझेल ₹3-3 प्रति लिटरने महागले:दिल्लीत आता पेट्रोल ₹97.77 आणि डिझेल ₹90.67 प्रति लिटर झाले

पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे. दिल्लीत आता पेट्रोल 94.77 रुपयांऐवजी 97.77 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेलची किंमत 87.67 वरून वाढून 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत वाढ का झाली? पेट्रोलच्या किमती वाढण्यामागे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आहे. इराण आणि अमेरिकेचे युद्ध सुरू होण्यापूर्वी…

Read More

लातुरात नीटचे पेपर सेटर निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या ताब्यात:शुभमसह इतर आरोपींची दिल्लीत चौकशी, मनीषा ‌‌वाघमारेही अटकेत

नीटची परीक्षा ३ मे रोजी झाली. पण १ मे रोजी प्रश्नपत्रिका लातुरातील विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर हस्तलिखीत स्वरुपात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु या प्रश्नपत्रिकेचा स्त्रोत अद्याप पोलिसांना सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडे ज्या पालकाने (या पालकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) तक्रार केली त्यांच्याकडे एका विद्यार्थ्याकडून परीक्षेच्या दोन दिवस आधी एक प्रश्नपत्रिका आली होती….

Read More

SIR 3.0, 9.86 crore voters in Maharashtra to be verified at home from June 30

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. जो सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय जनगणनेसोबतच पार पाडला जाईल. या टप्प्यात देशभरात ३.९४ लाखांहून अधिक बीएलओ ३६.७३ कोटी मतदारांची, तर महाराष्ट्रात ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय:सरकारी भरती आरक्षण नियमात बदल; लाभार्थ्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाही, ओबीसी महासंघाचा विरोध, रस्त्यावर उतरण्याचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पर्धा परीक्षांपासून ते जलसंधारणापर्यंत अनेक धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावण्यात आला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारने आता ‘गुणवत . नव्या निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. त्यांची गणना…

Read More

डिफेन्स हब:शिर्डीत 3,000 कोटी रुपये गुंतवणुकीतूनतोफगोळ्यांचा जगातील तिसरा मोठा प्रकल्प, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते 23 मे रोजी लोकार्पण

साईबाबांची भूमी शिर्डी आता देशाचे महत्त्वाचे संरक्षण केंद्र (डिफेन्स हब) म्हणून उदयास येत आहे. निवे ग्रुपने शिर्डी एमआयडीसीत अवघ्या १२ महिन्यांत ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून हा भव्य प्रकल्प उभारला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते २३ मे रोजी याचे लोकार्पण होणार आहे. राज्य शासनाचा पुढाकार व ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून हा प्रकल्प वेगाने…

Read More

'याचाही संतोष देशमुख करा':हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागणाऱ्या कीर्तनकारावर गेवराईत जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने मारहाण

गेवराई येथील स्वानंद सेवा गुरुकुलचे संचालक कीर्तनकार कैलास आनंदे यांच्यावर गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून काही व्यक्तींनी लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आनंदे हे आळंदीला जात असताना जातेगाव रोडवर आरोपींनी त्यांना अडवून ही बेदम मारहाण केली असून, हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…

Read More

महाराष्ट्रात 1.14 लाख कोटींची गुंतवणूक!:मुंबईत साकारणार देशातील मोठे 'एआय कॉम्प्युट हब', 2 हजार कामगारांना रोजगार

महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात 1 लाख 14 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री समिती कक्षात संपन्न झालेल्या या सामंजस्य करार सोहळ्यास उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह…

Read More

हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी अंबादेवी, एकवीरादेवीला साकडे:आयोजकांनी निर्विघ्नतेसाठी पूजा-अर्चा केली

अमरावती येथील दसरा मैदानात ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निर्विघ्न आयोजनासाठी हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आई अंबादेवी आणि एकवीरादेवीला साकडे घातले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा व आरती केली. आयोजकांनुसार, हिंदूबहुल देशात हिंदूंना घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि वक्फ जिहाद यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे…

Read More

जलसंकट टळले, मजीप्रा कंत्राटदारांचे आंदोलन मागे:आमदार संजय खोडके यांच्या मध्यस्थीने प्रश्न सुटला

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) कंत्राटदारांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरुवारी सायंकाळी मागे घेतले. आमदार संजय खोडके यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन थांबले असून, अमरावती शहरातील संभाव्य पाणीसंकट टळले आहे. आमदार खोडके यांनी कंत्राटदारांना त्यांच्या प्रलंबित रकमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असून, येत्या आठवडाभरात कंत्राटदारांना त्यांची देयके…

Read More

एका कॉलमुळे हरवलेल्या वृद्धेचा तीन तासांत शोध:अमरावती मनपाच्या आधार केंद्राची कौतुकास्पद कामगिरी

अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या पथकाने हरवलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांत शोधून तिच्या घरी सुखरूप पोहोचवले. या कामगिरीमुळे आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव असून, त्या बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या रहिवासी आहेत. सकाळी ९ वाजता त्या काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या…

Read More