पुण्यात हडपसर परिसरातील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू सापडली:बॉम्ब शोधक पथकाकडून जिलेटिनच्या कांड्या निकामी
हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत बॉम्ब सदृश वस्तूत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. पोलिसांच्या पथकाने त्या सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केल्या. हडपसर भागात खासगी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू एकाने सायंकाळी पाहिली. त्याने या…