Headlines

भोंदू मनोहर भोसलेच्या पापाचा घडा भरला!:शेतकऱ्याला 41 हजारांना लुटले, फसवणूक केल्याप्रकरणी करमाळ्यात तिसरा गुन्हा दाखल

भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून, मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची 41 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन सहकाऱ्यांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथील फिर्यादी शेतकरी दिलीप अजिनाथ राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2025 पासून सुरू असलेल्या मुतखड्याच्या त्रासावर वैद्यकीय…

Read More

शासकीय कर्करोग रुग्णालयात लवकरच पेट स्कॅन सुविधा:अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात लवकरच ‘पेट स्कॅन’ सुविधा उपलब्ध होणार आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी बुधवारी, १३ मे २०२६ रोजी रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यात ही माहिती दिली. त्यांनी प्रलंबित ‘पेट स्कॅन’ कक्षाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे रुग्णालयाच्या सुविधांचा विस्तार होईल. सध्या रुग्णांना ‘पेट स्कॅन’ तपासणीसाठी खासगी रुग्णालयात मोठी…

Read More

अमरावती विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या नवीन इमारतीचा कार्यारंभ:बुलढाणा येथे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे संचालित मॉडेल डिग्री कॉलेज, बिरसिंगपूर, बुलढाणा येथील नवीन इमारतीचा कार्यारंभ आज, गुरुवार, १४ मे रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. या सोहळ्याला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याच्या युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. हा विशेष कार्यक्रम मॉडेल डिग्री कॉलेज परिसर, अजिंठा रोड, ग्राम-बिरसिंगपूर,…

Read More

मध्यप्रदेशातून 25 लाखांची अवैध दारू जप्त:अमरावती ग्रामीणमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सहा आरोपींना अटक

अमरावती ग्रामीणमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून येणारी २५ लाख ३२ हजार ७७० रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी चिखलदरा मार्गावर करण्यात आली असून, यात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक…

Read More

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा:विज पडून 18 मेंढ्यांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. तालुका सातारा येथील कोंडवे गावात विजेचा तडाखा बसून १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

Read More

बंद रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला:हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू

अमरावती येथील पठाण चौक परिसरात एका बंद रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. बुधवारी, १३ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वजीर पटेल यांच्या संस्थेद्वारे चालवले जाणारे हे रुग्णालय अनेक दिवसांपासून बंद होते. गेल्या काही…

Read More

NEET Exam Cancellation: CEO Kukreja Demands Transparency

नीट (NEET) परीक्षा रद्द होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी पारदर्शकता आणि विश्वासार्हता अत्यंत आवश्यक आहे. अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वासाला तडा जातो, असे मत एलन करिअर इन्स्टिट्यूटचे सीईओ . परीक्षा रद्द झाल्यामुळे पुन्हा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी एलन संस्था खंबीरपणे उभी असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले. हा काळ…

Read More

अमूल दूध प्रति लिटर ₹2 महाग झाले:अर्ध्या तासानंतर मदर डेअरीनेही ₹2 प्रति लिटर दर वाढवले, नवीन दर उद्यापासून लागू होतील

अमूलच्या पाठोपाठ मदर डेअरीनेही बुधवारी दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. दोन्ही कंपन्यांचे नवीन दर गुरुवार (14 मे) पासून लागू होतील. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या प्रमुख प्रकारांवर आणि पॅकवर किमती वाढवल्या आहेत. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननुसार, पशुखाद्य, पॅकेजिंग आणि इंधनाचा खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. अमूलचे म्हणणे आहे की…

Read More

गारखेड्यात रेल्वेच्या जेसीबीने केबल तोडली:33 केव्ही वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या प्रयत्नाने मध्यरात्री पूर्ववत

छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा परिसरात रेल्वे विभागाच्या जेसीबीने खोदकाम करताना महावितरणची भूमिगत ३३ केव्ही वीजवाहिनी तोडली. यामुळे गारखेडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मध्यरात्री अडीच वाजता हा वीजपुरवठा पूर्ववत केला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महापारेषणच्या १३२ केव्ही सातारा उपकेंद्रातून महावितरणच्या ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्राला वीजपुरवठा होतो….

Read More

सिंधुदुर्गात 3 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू:दोघेजण थोडक्यात बचावले, वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणातील घटना

राज्यात उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी तरुण जलाशय, विहिरी आणि तलावांवर पोहण्यासाठी गर्दी करत असताना, हा आनंद अनेकदा जीवावर बेतत असल्याच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात घडली असून, तिथे तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोघे जण बचावले असल्याची माहिती आहे….

Read More