Headlines

लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी सटाण्यात उपोषण मागे, साक्री-शिर्डी महामार्गाचे काम 20 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन‎

शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सोनवणे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर दुसऱ्या दिवशी यश मिळाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत अपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करण्यात येऊन २० तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. साक्री-शिर्डी महामार्गावरील सुकड नाला ते बसस्थानकापर्यंतचे काम पूर्ण…

Read More

स्पर्धात्मक युगात योग्य शाखेची निवड करा:शरद सावंत यांचे आवाहन; नामपूरला आदर्श शिक्षण संस्थेतील दहावीतील गुणवंतांचा सत्कार‎

शालांत परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी योग्य शाखेची निवड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदर्श शिक्षण संस्थेत आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अध्यक्ष शरद सावंत या . श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान आणि आदर्श शिक्षण संस्था, नामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा…

Read More

सावंगी परिसरात बसचे ब्रेक फेल; 50 प्रवासी बचावले:चालकाची प्रसंगावधानता, भुसावळकडून येत होती बस‎

भुसावळकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका एसटी बसचे धावत्या प्रवासात जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील सावंगी टोल नाका परिसरात अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली. मात्र, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे प्राण वाचले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना सुमारास घडली आहे. भुसावळ डेपोची (एमएच ०९ ईएम २५७५) ही बस छत्रपती…

Read More

राजस्थानमधील बाडमेरमध्ये तापमान 48°C च्या वर:बरेलीमध्ये वादळामुळे धावत्या गाड्यांवर झाडे-खांब कोसळले; बिहार-महाराष्ट्रात 10 मृत्यू

राजस्थानमध्ये मंगळवारी विक्रमी उष्णता होती. या हंगामात पहिल्यांदाच तापमान 48°C च्या वर पोहोचले. बाडमेर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले, जिथे कमाल तापमान 48.3°C नोंदवले गेले. फलोदीमध्ये 46.4°C, जैसलमेरमध्ये 45.8°C, चित्तोडगडमध्ये 45.6°C आणि बिकानेरमध्ये 45°C तापमान होते. मध्य प्रदेशात दोन प्रकारचे हवामान दिसून आले. एकीकडे रतलाम सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे पारा…

Read More

कन्नड शहरावर पाणीटंचाईचे सावट; अंबाडी प्रकल्पात 16 टक्केच साठा:6453 नळजोडण्यांचे सर्वेक्षण, अनधिकृत नळांवर होणार कारवाई‎

शहराची तहान भागविणाऱ्या अंधानेर येथील अंबाडी मध्यम प्रकल्पात केवळ १६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. ग्रॅव्हिटीने (गुरुत्वाकर्षणाने) पाणीपुरवठा करणे केवळ महिनाभरच शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिष . कन्नडची लोकसंख्या ५५ हजारांच्या पार गेली आहे. पिशोर नाका, चंद्रलोकनगरी, नर्सिंगपूर, शरद पवार कॉलनी आणि म्हाडा यांसारख्या नवीन वसाहतींच्या हद्दवाढीमुळे पाणीपुरवठ्यावर…

Read More

भरधाव क्रुझरची दुचाकीस धडक; एकजण जागीच ठार:पैठणच्या इसारवाडी परिसरात घडला अपघात‎

छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील ईसारवाडी शिवारातील एचपी पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझर वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. विष्णू अण्णा बोबडे (६२, रा. वाहेगाव ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू बोबडे हे त्यांच्या दुचाकी (एमएच २० २४२) वरून…

Read More

India Gold Silver Import Duty Hiked

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक भारत सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवरील शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवले ​​आहे. बुधवारी जारी केलेल्या आदेशात हा निर्णय घेण्यात आला. परदेशी खरेदी कमी करणे आणि देशाच्या परकीय चलन साठ्यावर पडणारा दबाव कमी करणे हा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयामुळे देशातील सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. भारत हा जगातील सोने-चांदीचा…

Read More

टाकळी पैठण ग्रा.पं. उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड:गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष‎

ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी पैठण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जल्लोष साजरा केला. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजय गोरे, व्हा. चेअरमन आप्पासाहेब ठोंबरे, माजी सरपंच गंगाधर जाधव, सखाराम सोलाटे, माजी उपसरपंच कडुबाळ सुसे, माजी उपसरपंच रघुनाथ जाधव, भानुदास लाटे यांनी नूतन उपसरपंच चंद्रहार लाटे यांचे अभिनंदन केले….

Read More

अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यांचे लखनऊमध्ये निधन:मृत्यूचे कारण अजून अज्ञात, 38 वर्षांचे होते; पत्नी अपर्णा भाजप नेत्या आहेत

सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे बंधू आणि भाजप नेत्या अपर्णा यांचे पती प्रतीक यादव यांचे बुधवारी निधन झाले. ते 38 वर्षांचे होते. सूत्रांनुसार, सकाळी 6 वाजता त्यांना लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रतीक हे मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. त्यांनी ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठातून…

Read More

ओळख लपवण्यासाठी फरार आरोपी बनला भिकारी:पंढरपूर येथून अटक, सिल्लोड ग्रामीण ठाण्यामध्ये दाखल होता मनुष्यवध, विनयभंगाचा गुन्हा‎

मनुष्यवध, विनयभंगासारख्या गुन्ह्यात एका महिन्यापासून फरार असलेला सिल्लोड तालुक्यातील भवन येथील आरोपी पंढरपूर येथे लपून बसला होता. ओळख लपवण्यासाठी तो भिकारी बनला. मात्र, सिल्लोड पोलिसांनी अखेर त्याला सोमवारी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील मंदिरासमोरून भिकाऱ्याच्या वेशात असताना अटक केली. अनिल मनोहर मोहिते, (रा. भवन ता. सिल्लोड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ३ एप्रिल रोजी भवन…

Read More