अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना 'टीईटी'तून सूट:हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश, आदेश डावलणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असण्याची अट अनिवार्य नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या निकालामुळे राज्यभरातील अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण अधिकाऱ्यांनी ‘टीईटी’ पात्रतेअभावी नाकारलेले शालार्थ आयडी आणि पदमान्यतेचे प्रस्ताव आता पुन्हा विचाराधीन घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सय्यद अबू…