नसरापूर प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे पीडित कुटुंबाच्या भेटीला:वेगवान न्यायासाठी प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणार
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन…