Headlines

राऊतांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा:भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद, राऊतांचा पक्ष औरंगजेबाच्या चरणावर अर्पण- नवनाथ बन

संजय राऊत यांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा. रोज कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी उबाठा गट सोडत असताना भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवून त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करण्याची काँग्रेसची जुनी भूमिका आहे. संजय राऊत हेही त्याच अजेंड्यावर काम करत असून महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा…

Read More

कॉम्प्रोमाइजसाठी ऑफर झाले होते 1 लाख रुपये:पीके अभिनेत्री मानवी गागरू म्हणाली- हे नॉन नेपोकिड्ससोबत घडत राहते

पीके, किल दिल आणि शुभ मंगल ज्यादा सावधान यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री मानवी गागरूने कास्टिंग काउचबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, करिअरच्या सुरुवातीला तिला तडजोड (कॉम्प्रोमाइज) करण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. अलीकडेच ‘टू गर्ल्स विथ टू कप्स’च्या पॉडकास्टमध्ये मानवी गागरूने सांगितले आहे की, करिअरच्या सुरुवातीला तिला एका कोऑर्डिनेटरकडून मेसेज…

Read More

निम्मा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षाच:जुलै ते नोव्हेंबर हे 5 महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक, मुंबई-पालघरसह 17 जिल्ह्यांमध्ये दमट हवेचा त्रास वाढणार

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) 6 जून रोजी तळकोकणात प्रवेश केला. त्यानंतर 8 जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर परिसरापर्यंत मजल मारली. त्यामुळे राज्यभरात लवकरच पावसाची धूम सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, त्यानंतर मान्सूनची प्रगती पूर्णपणे ठप्प झाली असून महाराष्ट्रातील मोठा भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान तज्ज्ञांच्या…

Read More

370 रुपयांची बिर्याणी अन् 'तो' आक्षेपार्ह जोक भोवला!:प्रणीत मोरे आणि सेजल पवारची सायबर सेलकडून 8 तास कसून चौकशी; मोबाईल जप्त

स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या अडचणीत आता प्रचंड वाढ झाली आहे. मृतदेहाच्या खाजगी भागावर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी आणि ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’चा जोक प्रणीतच्या चांगलाच अंगलट आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र सायबर सेलने प्रणीत मोरे आणि वैद्यकीय क्षेत्रातीलविद्यार्थिनी सेजल पवार हिला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी या दोघांची सायबर सेलच्या पथकाकडून तब्बल…

Read More

'राजकीय पक्षांतरांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करावा':याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट टिप्पणी, 'ठोस पुरावेच नाहीत!'

देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून आमदार-खासदारांची फोडाफोड केली जात असल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने याचिकेतील आरोपांना “अस्पष्ट, सर्वसाधारण आणि पुराव्यांविना केलेले” असे संबोधत सुनावणी करण्यास नकार दिला. या याचिकेमुळे अलीकडच्या काळात विविध राज्यांमध्ये झालेल्या राजकीय पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा सुरू झाली होती. नेमकी याचिका काय होती?…

Read More

धक्कादायक:‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून पुण्यात मित्राकडून मित्राचा खून, तिन्ही आरोपींना अटक, बेसबॉल बॅटने बेदम मारहाण

गोखलेनगर परिसरात एका तरुणाची बेसबॉल बॅटने बेदम मारहाण करून झालेल्या हत्येप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “कॉमन गर्लफ्रेंड’ (दोघांची एकच प्रेयसी) असल्याच्या वादातून अत्यंत जवळच्या मित्रानेच आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हर्ष मच्छिंद्र जाधव (२३, रा. गोखलेनगर) या तरुणाचा निर्घृण खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत तिन्ही…

Read More

'आगे आगे देखो होता है क्या!':6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा खळबळजनक दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर आता ‘ऑपरेशन टायगर…

Read More

मुव्ही रिव्ह्यू- कॉकटेल 2:प्रेम आणि मैत्रीच्या बदलत्या अर्थाची कहाणी, शाहिद, कृती आणि रश्मिकाचे त्रिकुट प्रभाव टाकते

कलाकार- शाहिद कपूर, क्रिती सेनन, रश्मिका मंदाना दिग्दर्शक- होमी अदजानिया कालावधी- 2 तास 30 मिनिटे रेटिंग- 3.5/5 14 वर्षांपूर्वी आलेल्या ‘कॉकटेल’ने मैत्री, प्रेम आणि नात्यांमधील गुंतागुंत एका नव्या शैलीत सादर केली होती. आता दिग्दर्शक होमी अदजानिया ‘कॉकटेल 2’ घेऊन आले आहेत. यावेळी कथा आधीपेक्षा अधिक परिपक्व आहे. चित्रपट प्रेम मिळवण्याबद्दल नाही, तर प्रेम टिकवून ठेवण्याच्या…

Read More

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा अंक!:6 खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला? बच्चू कडूंचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने उलथापालथ सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (उबाठा) तब्बल सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर, आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या…

Read More

'भारत फोर्ज'ची जागतिक झेप!:भारत फोर्ज आणि एएम जनरल मिळून बनवणार प्रगत तोफखाना प्रणाली

पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि लष्करी वाहन उत्पादक एएम जनरल यांच्यात पॅरिसमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित ‘युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात’ या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीमुळे जगभरातील लष्करी दलांसाठी प्रगत, हलक्या वजनाची आणि अत्यंत टिकाऊ ‘माउंटेड आर्टिलरी गन सिस्टीम’ उपलब्ध होणार आहे. या…

Read More