रुग्णालयाच्या स्वच्छतेवरून सुनेत्रा पवार संतापल्या!:अचानक पाहणीत उघडकीस आला अस्वच्छतेचा प्रकार; कर्मचाऱ्यालाच सुनावले खडे बोल
बारामतीतील एका रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय परिसरातील अस्वच्छता आणि व्यवस्थेतील त्रुटी पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांची ‘नावे लिहून घ्या’ असे निर्देशही यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा…