नाइट लँडिंगचे कारण देत गोव्याचे विमान 3 महिने बंद:हैदराबादच्या विमानाला सूर्यास्ताची अडचण पण गोव्याच्या उड्डाणावरही बंदी
सोलापूर-गोवा आणि सोलापूर- हैदराबाद ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सचे एकच विमान आहे. हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेकऑफ करणे कठीण आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबादसह गोव्याचीही विमानसेवा २० जूनपासून पुढील ३ महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादसाठी नाइट लँडिंगची अडचण असू शकेल, पण गोवा विमानाची वेळ…